राज्य सरकारचं खातेवाटप जाहीर
नितेश राणे यांच्याकडे मत्स्योद्योग आणि बंदर विकास खाते
मुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहमंत्रीपद ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना गृहनिर्माण आणि नगरविकास तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अर्थ खातं
सिंधुदुर्ग
राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर बरेच दिवस रखडलेलं राज्य सरकारचं खातेवाटप शनिवारी उशिरा जाहीर करण्यात आलं आहे. त्यानुसार मुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहमंत्रीपद असणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना गृहनिर्माण आणि नगरविकास खातं मिळालं आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अर्थ खातं देण्यात आलं आहे.
राज्यात देवेंद्र फडणवीस सरकार सत्तेवर आल्यानंतर मागील रविवारी मंत्रीमंडळाचा विस्तार करण्यात आला. मात्र मागील आठवडाभर खातेवाटप रखडलं होतं. आज नागपूर मधील हिवाळी अधिवेशन पार पडल्यानंतर काही वेळापूर्वी खाते वाटप जाहीर करण्यात आले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र ना. नितेश राणे यांच्याकडे मत्स्यव्यवसाय आणि बंदर विकास वाटप देण्यात आले असून रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांच्याकडे उद्योग खात्याचा कार्यभार देण्यात आला आहे