“बेस्ट सपोर्ट फाॅर व्हिसेबल पुरस्कार” मिळाल्याबद्दल दिव्यांग बांधवांकडुन अभिनंदन..
अपंगांनी अपंगांसाठी एकत्र येऊन कार्य करणाऱ्या राष्ट्रीय अपंग महासंघ , महाराष्ट्र शाखा – जिल्हा सिंधुदुर्ग च्या सहकार्यातून ऑनररी कॅप्टन आबा पाटील दिव्यांग फाऊंडेशन व राष्ट्रीय अपंग विकास महासंघाचे राज्य सचिव बाळासाहेब पाटील यांनी सन २०२४ – २५ चा राज्यस्तरीय ” बेस्ट सपोर्ट फाॅर हिसेबल पुरस्कार ” प्रसंन्ना देसाई यांना जाहीर केला .
विविध क्षेत्रात दिव्यांग व सर्वसाधारण व्यक्तींनी दिव्यांगांसाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांच्या गौरव म्हणून हा पुरस्कार ३ डिसेंबर ला जागतिक अपंगदिनाचे औचित्य साधून हा राज्यस्तरीय पुरस्कार कमिटीद्वारे बाळासाहेब पाटील यांनी जाहीर केला.
भाजपा दिव्यांग आघाडी चे जिल्हा प्रभारी म्हणून संघटनात्मक जबाबदारी पार पाडत असताना दिव्यांगांसाठी विविध उपक्रम प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई घेत असतात. ह्याच कार्याची दखल घेऊन त्यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल वेंगुर्ले भाजपा कार्यालयात येऊन भाजपा दिव्यांग विकास आघाडीचे सहसंयोजक शामसुंदर लोट, दिव्यांग सेनेचे मनोज सातोसे व संजय देसाई, भाजपा दिंव्यांग आघाडीचे वेंगुर्ले संयोजक भरत परब यांनी प्रसंन्ना देसाई यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.