*बांदा येथील सेवाभावी स्व.डॉ.द. भि.खानोलकर यांच्या ‘जनसेवा निधी’ ट्रस्टचे आदर्श पुरस्कार जाहीर*
सावंतवाडी
बांदा येथील सेवाभावी स्व.डॉ.द.भि.खानोलकर यांच्या ‘जनसेवा निधी’ ट्रस्टचे पुरस्कार जाहीर झाले असून आदर्श प्राथमिक शिक्षक पुरस्कार कामळेवीर पूर्ण प्राथमिक शाळेचे शिक्षक विलास अशोक गोठोसकर यांना जाहीर झाला आहे. आदर्श माध्यमिक शिक्षक पुरस्कार मंगेश नरेश कांबळी (अ.वि.जावडेकर विद्यालय,शिरोडा) यांना तर नाना तारी स्मृती आदर्श समाजसेवक पुरस्कार सावंतवाडी येथील सामाजिक बांधिलकी संघटनेचे रवी जाधव यांना जाहीर झाला आहे.तात्यासाहेब नाबर आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार हनुमंत विष्णू वाळके (शेठ म.वि.केसरकर माध्यमिक विद्यालय, वारगाव-कणकवली) यांना जाहीर झाला आहे.
विलास गोठोसकर हे ग्रामीण भागातील मुलांसाठी विविध शैक्षणिक उपक्रम राबवून नेहमीच विद्यार्थी विकास हे एकच ध्येय समोर ठेवून कार्यरत असतात.
शिक्षक मंगेश कांबळी हे गावर्य अ.वि.जावडेकर विद्यालय,शिरोडा या माध्यमिक शाळेत विज्ञान शिक्षक असून मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेत विविध उपक्रम राबवून वर्ग अध्यापनाबरोबरच विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात.
सामाजिक कार्यकर्ते रवी जाधव आणि त्यांची सामाजिक बांधिलकी संघटना यांची समाजाप्रती असलेली आत्मियता आणि कठीण प्रसंगात धावून जाण्याची तत्परता या गुणांमुळेच त्यांना कै.नारायण यशवंत तथा नाना तारी स्मृती आदर्श समाजसेवक पुरस्कार जाहीर झाला आहे.
पुरस्कार वितरण सोहळा रविवार दी ५ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी ३.३० वाजता पी एम श्री केंद्रशाळा,बांदा नं. १ च्या सभागृहात होणार आहे.
———————————————-
🤱🏻 *जान्हवी बेबी केअर, दोडामार्ग* 🤱🏻
🤱🏻 *लहान बाळांसाठी सर्व साहित्य मिळणारे एकमेव दुकान* 🤱🏻
———————————————-
🎁 जन्मलेल्या बाळांसाठी उशी, लड, मच्छरदाणी, टोपरे, लंगोटी, मँट, *पाळणा* कपडे, बेबी किडस् , शाँल, टाँवेल, *खेळणी* : मुठ, थिथर, सर्व बाँटल, खुळखुळा 🚲 *सायकल* 👉 १२, १४, १६, २०, २४, २६ इंच उपलब्ध // *वाँकर* 👉 म्युझिक / अँडजेस्टमेन्ट उपलब्ध 🛴, मँट, 🍼 बाँटल, टिटर, 🧸 ट्रेडी, *झोपाळा* 👉 कुशन / प्लॅस्टिक उपलब्ध, शाँल, *पाळणा* 👉 ट्रोली पाळणा / बाँक्स पँकिग पाळणा उपलब्ध . मच्छरदानी, गादीसेट, बेबी गिफ्ट्स, पांड्या, लिंजा, कार 🚗, बेबी टाँवेल, सुंगधिक फरफ्युम, विविध गिफ्ट, सर्व प्रकारची खेळणी उपलब्ध.
🛣️ पत्ता : *जान्हवी बेबी केअर, दोडामार्ग, श्रीराम सुपर मार्केटच्या शेजारी 📲 / प्रोप्रा. पत्रकार भूषण सुधाकर सावंत 🪀9309978684*
———————————————-
🏦 ✍🏼 *सिंधदुर्ग न्युज कार्यालय* ✍🏼 बाजारपेठ-दोडामार्ग, तिराळी रोड. *बातम्या व जाहिरातीसाठी 🪀9309978684 संपर्क साधा*
———————————————-
https://www.facebook.com/share/p/18LJRsd97S/