*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा साहित्य प्रेरणा कट्टा आजगावचे सन्मा सदस्य कवी सोमा चंद्रकला चंद्रकांत गावडे लिखित अप्रतिम काव्यरचना*
*अंधार प्रकाशत आहे सुखाने*
सूर्य अस्ताला जाताना संधीप्रकाश ठेऊन जातो |
आणि थोडयाच वेळात अंधार त्यालाही लपवतो ||१||
अंधार म्हणजे उद्याच्या गुप्त उषःकालाची नांदी
ठेऊनि संवर्धीत उष:काल महदानंद सांदी ||२||
दुःख सुखाला निघाले अवघेच ग्रासावया मात्र |
असेच ते आहे सुखाला समृद्ध करण्याचे शास्त्र ||३||
भीती संपवित आहे का तुमच्या यश शिखराला |
नव्हे भीतीचा दरारा दाऊनि लपवले यशाला ||४||
जो आनंदे यशसूर्य घाली यशमाला कर्तव्याला
यशप्राप्ती समयी वाटावा उष:काल आता झाला ||५||
घाबरणारे अपयशासह अंधारात झाले गुप्त
अंधार प्रकाशत आहे धिरोदात्तांसाठीच सुप्त ||६||
खरोखर अंधारातच सत्य प्रकटत असते
अंधारच नव्या दिशांची शोधांची जननी असते ||७||
कवी : श्री सोमा चंद्रकला चंद्रकांत गावडे.
फणसखोल, आसोली, ता.- वेंगुर्ला,
जि.- सिंधुदुर्ग, राज्य – महाराष्ट्र.