You are currently viewing पहाट…

पहाट…

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य लेखक कवी डॉ. जी. आर. उर्फ प्रवीण जोशी लिखित अप्रतिम लेख*

 

*पहाट…*

 

निरव शांतता पाहटेचा

चंद्रबिंब , अंधुक चांदण , हवेत बोचरी थंडी , गर्द धुके शुभ्र दुलई लेपटून घेतलेली अवनी !

दवबिंदुचा सडा चुहकडेच पसरलेला हिरवीगार गवत पाती, दवबिंदु चंद्रकिरणात मोतीचे दाणे घेऊन. अजून रात किड्यांचे साम्राज्य , कुठेकुठे फुलू पहाणार्या कुंद कळ्या , सोबत ,

रात पक्ष्यांची फडफड ,थंड गार वाऱ्याची झुळूक

ओढ्याच्या पाण्याचा खळ खळ आवाज ,झाडावर वेलीवर चमकणारे काजवे . पश्चिमेला शुभ्र शुक्रतारा, त्याच लोभस चकाकणारे व्यक्तिमत्त्व , असंख्य गगनातील तारका . शांत श्रांत अवनी च रूप गर्द झाडी पलीकडे डोंगर रांगा

उगवती चे साक्ष देणारे आकाशी रंग किंचित जांभळा केशरी ताम्बुस छटा नी बदल घडवत मावळत शुक्रतारा.

 

मध्येच पक्ष्यांची थोडी हालचाल शुभ्र उमळणारी तगर , ओढ्याच्या कडेला मोरांच्या केका ,

उगवतीला तांबडं फुटून झुंजू मंजू झालं असेल नसेल

चिमण्यांचा किलबिलाट , बंगल्याची फडफड गावकुसात पलीकडून येणारा घंटा नाद .

झोपडीतून येणार धूर व त्यात मिसळणारे दाट धुके .

टिपेच्या आवाजात येणारी

नमजची बांग व कोंबड्या चे अरवणे त्यातच घंटा नाद व चिवचिवाट असं ध्वनी सरगम

पार्व्याची घुटूर घुम ही सर्व अवनीला जाग आल्याची नांदी .

सोनेरी किरणांची वरात त्यातच गाई म्हशीचे हंबरणे त्यांच्या गळ्यातील घुंगरू आवाज शेतीकडे जाणारी काही वर्दळ , धुक्यात भिजलेल्या पाऊल वाटा , शीत वाऱ्याची झुळक , चिमण्यांचा चिवचिवाट , मध्येच कुठून तरी भारद्वाज पक्षी ह्या फांदीवरून त्या फांदीवर जात , त्याची शोधक नजर , कदाचित दर्शन देण्यासाठी आलेला असावा . त्याला काय पाहिजे हे न कळणार , विचित्र कोड्यात हरवल्या सारखा , त्याचे तांबडे डोळे व पंख उठून दिसणारे .

कुहुकुहू अशी साद आम्र वृक्षा वर , आंब्याचा मोहर फुटून त्यातुन येणारा सुगंध , कुठंतरी लहान मोठया

कैऱ्या लांब देठावर हेलकावे घेत , सगळ्यांची नजर खेचुन घेत होत्या . सोबत राघु मैनेची जोडी त्यांचाच दिमाखात . हिरव्या कच्च्या कैरीवर चोच मारत, विठू विठू

मिटु मिटु ची भाषा लांब बाकदार लाल चोच , पोपटी अंगरखा घातलेली जोडी .

जवळच्याच विहिरीवर येणारा मोटे चा आवाज , बैलांच्या गळ्यातील घुंगरू चा आवाज, पाटात पडणारे पाणी . विहिरीच्या कडेला भिंतीतून फुटलेला पिंपळ , त्याच्या फांद्यांवर लोम्बकळणारी कित्येक सुगरणी ची घरटी. घरट्यात असणारे चिमुकले जीव . मध्येच फडफड करत उडणारे मोर त्यांच्या केका

पटातील पाण्यात चोच मारणारी साळुंकी .

सकाळ होऊन एक कासरा वर आलेला सूर्य तसा

हवेत आलेला उबदारपणा पण, पानंदीच्या वाटेवर वर्दळ वाढलेली . मळ्यातील वस्तीवर चाललेली काम झोपडीतून येणार धूर त्याची साक्ष देत होता .

प्रतिक्रिया व्यक्त करा