*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी चंद्रशेखर कासार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*कडाक्याची थंडी*
प्रेमात पडतात माणसं तेंव्हा
हवीहवीशी वाटते गुलाबी थंडी
धुंदीत मस्तीत राहतात ना तेंव्हा
झोंबते अंगाला भिनते नसानसात शराबी थंडी
लाजून हसते गोजिऱ्या गालात तेंंव्हा
अनुभवावी हसरी लाजरी थंडी
धडकी भरते भितीने थरथरते अंग
कापरे सुटून बोचते काटेरी थंडी
बर्फ हिमालयावर पडतो उत्तर पुर्वेला
धडकते दक्षिण पश्चिमेस कडाक्याची थंडी
हिवाळ्यात संक्रांतीला संक्रमण होते
तेंव्हा शेकोटी पेटते असते मरणाची थंडी
कवी :-
*चंद्रशेखर प्रभाकर कासार*
*चांदवडकर , धुळे.*
७५८८३१८५४३.