*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*धूसर*
पहाटे धुक्याने
धुसरला परिसर….
दवाने फुलातील
शिंपडले अत्तर…..
दाटून आला कंठ
वेळ निरोपाची आली
डोळ्यातील घनांनी
प्रतिमा धूसर झाली…..
सांजसमयी प्रकाश
होतो धूसर धूसर
पश्चिमेला क्षितिजावर
सांडतो रंग केशर…..
धूसर कविता
धूसर ओळी
डोळ्यात दाटली
अश्रूंची तळी……
धूसर संध्याकाळ
ज्योत थरथरते
ओठी आले गीत
मूकपणे गाते……!!
******””””******””
अरुणा दुद्दलवार✍️