*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी प्रा.सत्यवान घाडी लिखित अप्रतिम लावणी*
*हापूस आंबा*
***********
माझा हापूस आंबा बघा हाय लयभारी
आवं राया आंबा घ्यायला यावं माझ्या दारी।।धृ।।
दुनयेमंदी मिरवितो अपुले तो नाव
पण दलाल न्हाई देत बाजारात भाव
पाहून लयलूट त्याची लागते जिव्हारी
आवं राया आंबा घ्यायला यावं माझ्या दारी।।धृ।।१।।
सालच त्याची आहे पातळ कागदावानी
मग खुशाल घ्या ना तुम्ही पेटी चाचपुनी
आंबा सापडंल तुम्हां त्यात सावकारी
आवं राया आंबा घ्यायला यावं माझ्या दारी।।धृ।।२।।
त्याच्यासाठी राबराबतो शेतकरी दादा
पण दलाल घेतो सदा त्याचाच फायदा
म्हणतो मेला कसा भाव पडला बाजारी
आवं राया आंबा घ्यायला यावं माझ्या दारी।।धृ।।३।।
आंब्यामंदी हाय साऱ्या कोकणचं ते सार
मग कशाला करता तुम्ही अती विचार
घरच्या दरानं घ्या ना आंबा डझनवारी
आवं राया आंबा घ्यायला यावं माझ्या दारी।।धृ।।४।।
*********************************
*रचनाकार:-* प्रा.सत्यवान शांताराम घाडी
*गांव:-* किंजवडे, घाडीवाडी, देवगडदेवगड, सिंधुदुर्ग.
*ठाणे:-* दिवा.
🌸🌺🌸🌺🌸🌺🌸🌺🌸🌺🌸