कुडाळ :
वेताळ बांबर्डे विभाग शिक्षण प्रसारक मंडळ गुरुवर्य कै. शशिकांत अणावकर सर विद्यानगरी संचलित शिवाजी इंग्लिश स्कूल व दादासाहेब तिरोडकर कनिष्ठ महाविद्यालय पणदूरतिठा येथे “ग्लोबल नॉलेज पार्क” या ग्लोबल फाऊंडेशन मुंबईचे व्यवस्थापकीय संचालक मान. श्री. मनोज तिरोडकर यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या नवीन बहुउद्देशीय इमारतीचा उद्घाटन व हस्तांतरण सोहळा शुक्रवार दि. २० डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता ग्लोबल फाऊंडेशन मुंबईचे विश्वस्त मान. श्री. चारुदत्त नाईक व मान. श्रीम. आरती खाडे यांच्या शुभहस्ते आणि सर्व संस्था पदाधिकारी व संचालक सदस्य यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होऊन विद्यार्थ्यांच्या सेवेत दाखल होणार आहे. तरी आपली सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय आहे, असे आवाहन करण्यात आले आहे.