कुडाळ येथे युवक फिट येऊन रस्त्यावर पडला सामाजिक बांधिलकीच्या रूपा मुद्राने केले रुग्णालयात दाखल.
सावंतवाडी
रामदास भगवान राणे वय वर्षे 42 गणेश नगर कुडाळ येथील रहिवासी असून अचानक फिट येऊन रस्त्यावर पडला ही घटना मोती तलावाच्या बाजूला संध्याकाळी सहा वाजता घडली.
सामाजिक बांधिलकीच्या रूपा मुद्राळे, रवी जाधव व सामाजिक कार्यकर्ते अजित सांगेलकर यांनी रस्त्यावरून उचलून त्याला रुग्णालयात दाखल केले.
सदर युवकाला फिट येऊन पडला असा अंदाज डॉक्टर आणि वर्तवला त्याच्यावर उपचार चालू आहेत. सदर युवकाला काही आठवत नाही.
सदर युवकाची ओळख पटल्यास सामाजिक बांधिलकीचे कार्यकर्ते रवी जाधव किंवा रूपा मुद्राडे यांची संपर्क साधा 9422633971