You are currently viewing बांदा केंद्र शाळेचा १७१वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

बांदा केंद्र शाळेचा १७१वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

*बांदा केंद्र शाळेचा १७१वा वर्धापन दिन उत्साहात साजरा*

*बांदा*

बांदा गावचा ऐतिहासिक ठेवा असलेल्या पीएम श्री बांदा नं.१केंद्रशाळेचा १७१वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.
स्वातंत्र्यपूर्व कालखंडात १८डिसेंबर १८५३रोजी या शाळेची स्थापना करण्यात आली होती या शाळेला १७१ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल शाळेचा वाढदिवस साजरा करण्यात उत्साहात आला .बांदा केंद्र शाळा ही उपक्रमशील शाळा म्हणून ओळखली जाते.या शाळेतून शेकडो विद्यार्थी शिकून अनेक चांगल्या पदावर काम करत आहेत .बांदा गावचा ऐतिहासिक ठेवा म्हणून या शाळेकडे पाहिजे जाते. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रत्नाकर आगलावे शाळा व्यवस्थापन समिती सदस्य हेमंत मोर्ये, प्रदिप सावंत,माजी मुख्याध्यापिका उर्मिला मोर्ये, मुख्याध्यापक शांताराम असनकर विद्यार्थी व शिक्षक यांच्या उपस्थितीत शाळेचे औक्षण करून केक कापून शाळेचा वाढदिवस साजरा करण्यात आला.यावेळी विविध स्पर्धात्मक उपक्रमात सुयश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. वर्धापन यशस्वी पार पाडण्यासाठी पदवीधर शिक्षक उदय सावळ,जे.डी.पाटील, रंगनाथ परब, फ्रान्सिस फर्नांडिस,रसिका मालवणकर, स्नेहा घाडी, , शुभेच्छा सावंत,जागृती धुरी,मनिषा मोरे,कृपा कांबळे, सुप्रिया धामापूरकर यांनी परिश्रम घेतले.

प्रतिक्रिया व्यक्त करा