पणदूर-साईलवाडीतील ग्रामस्थांचे २३ रोजी उपोषण
कुडाळ
जीवन आनंद संस्था (मुंबई) संचलित संविता आश्रम (पणदूर) ने केलेल्या बेकायदेशीर व अनधिकृत बांधकामामुळे निर्माण झालेल्या समस्यांबाबत कुडाळ पं. स.ने कार्यवाही न केल्याने साईलवाडी येथील ग्रामस्थांनी २३ रोजी पं. स.समोर उपोषण करण्याची नोटीस गटविकास अधिकाऱ्यांना दिली आहे. लवकरात लवकर समस्यांचे निराकरण करा, अशी मागणी आहे, असे ग्रामस्थ रामचंद्र शेट्ये, उमेश साईल, नामदेव केरकर, सुरेश साईल, रामचंद्र साईल, बाळा साईल, प्रदीप साईल व नीलेश साईल यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.