You are currently viewing क्रांती साळगांवकर हिला रसायनशास्त्र विषयात ॲकडमी ऑफ सायंटिफिक अँड इंनोव्हेटीव्ह रिसर्च यांच्याकडून पीएच.डी पदवी प्रदान

क्रांती साळगांवकर हिला रसायनशास्त्र विषयात ॲकडमी ऑफ सायंटिफिक अँड इंनोव्हेटीव्ह रिसर्च यांच्याकडून पीएच.डी पदवी प्रदान

सावंतवाडी :

सावंतवाडी येथील संशोधक क्रांती निर्मला निशिकांत साळगांवकर हिला रसायनशास्त्र विषयातील महत्त्वपूर्ण संशोधनासाठी ॲकडमी ऑफ सायंटिफिक अँड इंनोव्हेटीव्ह रिसर्च (ACSIR) यांच्याकडून पीएच.डी पदवी प्रदान करण्यात आली आहे. तिच्या पीएच.डी प्रबंधांचे शीर्षक होते ” एलेक्ट्रॉनिकली इंटिग्रेटेड लाइट ॲबझॉरबस फॉर इफिशियंट आर्टिफिशियल फोटोसिंथेसिस अ बेबी स्टेप टुवर्डस् कार्बन न्युट्रल इकॉनॉमी”. तिचे संशोधन कार्य डॉ. सी. एस. गोपीनाथ यांच्या मार्गदर्शनाखाली ACSIR/CSIR नॅशनल केमिकल लॅबोरेटरी, पुणे येथे करण्यात आले. क्रांती हिने संशोधनादरम्यान 3 पेटंट प्राप्त केले आहेत. तिचे बीएससी पर्यंतचे शिक्षण श्री. पंचम खेमराज महाविद्यालय, सावंतवाडी येथे झाले. मुंबई विद्यापीठामध्ये तिने अग्र क्रमांक पटकावला होता. तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा