एकरकमी परतावा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
सिंधुदुर्गनगरी
महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय (ओबीसी) वित्त आणि विकास महामंडळ मर्यादीत, व उपकंपनी शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ सिंधुदूर्ग यांच्यामार्फत मुदती कर्ज योजना, मार्जिन मनी कर्ज योजना, स्वर्णिमा कर्ज योजना, बीज भांडवल कर्ज योजना अशा विविध कर्ज योजनेतंर्गत सिंधुदूर्ग जिल्ह्यातील इतर मागास (ओबीसी) प्रवर्गातील लाभार्थीना स्वयंरोजगाराकरीता अल्प व्याजदराने कर्ज वितरीत करण्यात आलेले आहे.
सिंधुदूर्ग जिल्ह्यातील या महामंडळाच्या थकीत कर्ज रक्कम असलेल्या लाभार्थीनी “ओबीसी” महामंडळाच्या जिल्हा कार्यालय सिंधुदुर्गमार्फत सर्व योजनांमध्ये लाभ घेतलेल्या लाभार्थीना संपूर्ण थकीत कर्ज रक्कमेचा एकरकमी भरणा करणाऱ्या लाभार्थीस थकीत व्याज रक्कमेत 50 टक्के सवलत देण्याबाबतची एकरकमी परतावा (OTS) योजना दि. 31 मार्च 2025 पर्यंत राबविण्यात येत आहे. त्यानुसार, महामंडळाच्या थकबाकीदार लाभार्थीनी या योजनेचा फायदा घेऊन कर्जमुक्त व्हावे व महामंडळाच्या नवीन कर्ज योजनांचा लाभ घ्यावा.
अधिक माहितीसाठी शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालय सिंधुदुर्ग, पत्ता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन सिंधुदुर्गनगरी ता. कुडाळ जि. सिंधुदुर्ग, दूरध्वनी क्रमांक ०२३६२ २२८१८९ किवा जिल्हा व्यवस्थापक प्रिती पटेल यांच्यांशी मो.क्र. ८६६८८९८९५० या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.