You are currently viewing कार व दुचाकी अपघातात युवक जखमी

कार व दुचाकी अपघातात युवक जखमी

कार व दुचाकी अपघातात युवक जखमी

सावंतवाडी :

अल्टोकारला मागाहून येणाऱ्या बुलेटची जोरदार धडक बसून झालेल्या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. तर बुलेटस्वार युवक किरकोळ जखमी झाला. सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास शहरातील चिटणीसनाका हनुमान मंदिर शेजारी हा अपघात घडला.

कोल्हापुर येथील पर्यटकांनी आपली अल्टो कार हनुमान मंदिर शेजारी पार्क केली होती. पार्क केलेली अल्टो रस्त्यावर आणत असतांना मागाहून येणाऱ्या बुलेटची कारला जोरदार धडक कारला बसली. यात दोन्ही वाहनाचे मोठे नुकसान झाले. अल्टो कारचालकाने रस्त्यावरील वाहनांकडे दुर्लक्ष करत कार रस्त्यावर आणण्याने हा अपघात घडला असे बुलेटस्वार युवकांचे म्हणणे होते. तर यात आपली काहीच चुक नसल्याचे कोल्हापुर येथील पर्यटकांचे म्हणणे होते. बुलेटस्वार सुसाट असल्याने गाडी कंट्रोल न झाल्याने त्याने कारवर आणून धडकली असे त्यांचे म्हणणे होते.

दरम्यान, घटनास्थळी पोलिसांनी दाखल होत अपघाताची माहीती घेत दोन्ही बाजूने तडजोडीचा प्रयत्न केला. मात्र, कोणीच तडजोडीस तयार नसल्याने दोघांनाही पोलिस ठाण्यात बोलावून घेतले. अखेर उशिरा हे प्रकरण तडजोडीने मिटविण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा