सावंतवाडी दफन भूमीमध्ये मोठ्या प्रमाणात झाडे झुडपे वाढली अनेकदा निवेदन देऊन सुद्धा नगरपालिकेचा दुर्लक्ष- कृष्णा लाखे
सावंतवाडी
सावंतवाडी दफनभूमीच्या बाजूला लाखे वस्तीतील नागरिकांनी दफन भूमी आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात काटेरी झाडे झुडपे वाढली आहे. अनेक वेळा नगरपालिकेला निवेदन देऊन सुद्धा नगरपालिकेने आमच्या मागणीकडे दुर्लक्ष केला अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
काल लाखे वस्तीमध्ये एक मयत झाल्याने मृतदेहाचे दफन करतेवेळी काटेरी झुडपांमुळे मोठी अडचण निर्माण झाली होती त्यामुळे नाईलाजास्तव पुन्हा एकदा लाखे वस्तीतील नागरिकांनी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देऊन आता तरी त्या ठिकाणाची साफसफाई करा अशी निवेदनाद्वारे कळकळीची विनंती.
सध्या स्थितीमध्ये सावंतवाडी शहरांमध्ये अनेक समस्यांचा पाढा वाचला जात आहे त्यामध्ये अजून एक याची भर पडली आहे.
मंडळाचे अध्यक्ष कृष्णा लाखे, संदीप लाखे, साई लाखे, राजा खोरागडे, धीरज लाखे, साई खोरागडे, इत्यादी लाखे वस्तीतील युवक उपस्थित होते.