नितेश राणेंना मंत्री पद मिळाल्यामुळे भाजपमध्ये नवचैतन्याचे वातावरण – प्रभाकर सावंत
रवींद्र चव्हाण पक्षाला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतील…
सिंधुदुर्गनगरी
नितेश राणे यांना मंत्रीपद मिळाल्यामुळे राज्यातील सर्व हिंदुत्ववादी संघटना आणि जिल्ह्यातील भाजपमध्ये नवचैतन्याचे वातावरण आहे. याचा फायदा निश्चितच येणाऱ्या काळात होणार आहे, असा विश्वास भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी व्यक्त केला. दरम्यान मावळते पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर भाजपने प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे ते पक्षाला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतील आणि शतप्रतिशत भाजप हे स्वप्न साकार करतील, असा आशावाद सावंत यांनी व्यक्त केला आहे. याबाबत त्यांनी प्रसिद्धीपत्रक दिले आहे.