*सिंधुदुर्ग जिल्ह्यात राणेंचाच प्रभाव*
*…पुन्हा सिंधुदुर्गचे राजकीय केंद्रबिंदू कणकवली*
विशेष संपादकीय…
सिंधुदुर्ग जिल्हा म्हणजे राणे हे समीकरण जवळपास गेली तीन दशके जुळून आले होते. नाम. दीपक केसरकर यांचा अपवाद वगळता सिंधुदुर्ग जिल्ह्यात राणेंना कोणीही शह दिला नव्हता. त्यामुळे आजपर्यंत जिल्ह्यावर राणेंची एक हाती मजबूत पकड होती. खास.नारायण राणे संसदीय वाटचालीनंतर नारायण राणेंचा वारसा चालवत नाम. नितेश राणे यांनी आजही राणे कुटुंबाची जिल्ह्यावर मजबूत पकड असल्याचे दाखवून दिले आहे आणि याचे कारण म्हणजे तरुण वयातच नाम.नितेश राणे यांना मिळालेले कॅबिनेट मंत्रीपद..! एखाद्या तरुण आमदाराची राजकीय इनिंग आमदारकीनंतर सुरू होते ती राज्यमंत्री पदापासून.. परंतु, नाम.नितेश राणे याला अपवाद ठरले आणि त्यांनी आपली मंत्रिपदाची इनिंग कॅबिनेट मंत्रीपदापासून सुरू करून आपल्यातील विशेष कलागुणांचे दर्शन दिले आहे.
नाम.नितेश राणेंनी देवगड विधानसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा विक्रमी मतांनी निवडून येत विरोधकांना एकहाती शह दिला आहे. आपल्या मतदारसंघात कोणीही स्टार प्रचारक न आणता नितेश राणेंनी संदेश पारकर यांना धोबीपछाड देत देवगड विधानसभा मतदारसंघामध्ये तिसऱ्यांदा विजयाचा गुलाल उधळला आहे. त्यामुळे निवडणुकीत निवडून येण्यासाठी ज्या कौशल्याची आवश्यकता असते ते कौशल्य नक्कीच भाजपाचे तरुण तडफदार उमेदवार नाम.नितेशजी राणे यांच्याकडे असल्यानेच त्यांना महाराष्ट्र राज्याच्या महायुती सरकार मधील मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रीपद देऊन त्यांचा गौरव केला आहे. एकेकाळी सिंधुदुर्ग जिल्ह्यावर नारायण राणे यांची एक हाती सत्ता होती. परंतु सावंतवाडीचे नाम.दीपक केसरकर यांनी त्यांच्या विरोधात पुकारलेल्या बंडाचा परिणाम म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यात नारायण राणे यांना वैभव नाईक यांच्याकडून पराभूत होण्याची वेळ आली होती. त्यानंतर काही काळ जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रात देखील नारायण राणे यांना आपला राजकीय प्रवास उलट्या दिशेने चालतो की काय? असा प्रश्न पडू लागला होता. कारण, त्याचवेळी कुडाळमधून नारायण राणे यांना पराभव सहन करावा लागला असतानाच देवगड मतदार संघातून त्यांचेच कनिष्ठ चिरंजीव नितेशजी राणे यांनी मात्र विजयाचा गुलाल उधळून “हम भी किसीसे कम नही” याची प्रचिती आणून दिली होती. 2014 नंतर 2019 च्या निवडणुकीत देखील नामदार नितेश राणे यांनी मतदारसंघावर आपली पकड मजबूत करताना त्यावेळचे त्यांचे प्रतिस्पर्धी सतीश सावंत यांना चारीमुंड्या चीत करून देवगड मतदार संघ आपल्या ताब्यात राखण्यात यश मिळविले होते.
दोन्ही वेळच्या लढतीमध्ये एक हाती सत्ता मिळविल्या मुळे नामदार नितेश राणे यांचा आत्मविश्वास दुणावला होता. आणि अलीकडेच झालेल्या विधानसभा निवडणुकीत नामदार नितेश राणे यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी संदेश पारकर यांचा पन्नास हजारापेक्षा जास्त मतांनी पराभव करून नितेश राणे काय चीज आहे हे दाखवून दिले होते. त्यामुळेच तीन वेळा निवडून येत हॅट्रिक करणाऱ्या नामदार नितेश राणे यांना राज्य मंत्रिमंडळात स्थान मिळणार हे निश्चित झाले होते.. याचे दुसरे कारण असेही असू शकेल की केंद्रीय मंत्रिमंडळात मागील कालावधीत नारायण राणे यांना सूक्ष्म लघु मध्यम उद्योग मंत्री म्हणून स्वतंत्र कार्यभार देत कॅबिनेट मंत्री पद दिले होते. परंतु अलीकडेच झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात नारायण राणे यांना स्थान न मिळाल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीत निवडून येणाऱ्या राणे पुत्रांपैकी एकाला मंत्रिपद मिळणार हे निश्चित झाले होते. त्यामुळेच भाजप कार्यकर्त्यांकडून नितेश राणे यांचा निवडणूक प्रचार करताना जिल्ह्याचे “भावी पालकमंत्री” असा वारंवार उल्लेख केला जात होता…आणि तो का केला जात होता याचा प्रत्यय आज नाम.नितेश राणे यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतल्यावर आला.
एवढ्या कमी वयात कॅबिनेट मंत्रीपद मिळणे हे नामदार नितेश राणे यांच्यासाठी अभिमानास्पद आहेच परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी सुद्धा गौरवास्पद आहे. नाम.नितेश राणे यांची राजकारणाची पद्धत म्हणजे रोखठोक बोलणे आणि ठासून उभे राहणे. नाम. नितेश राणे यांच्या विरोधात प्रचार करताना एका समाजाच्या धर्मगुरूंनी फतवे काढून भारतीय जनता पक्षाला मतदान न करण्याबाबत सूचना केली होती यावर निवडून आल्यावर परखडपणे प्रतिक्रिया देताना नाम.नितेश राणे यांनी फत्ते काढणाऱ्यांना सूचक इशारा देत बेकायदेशीर भोंगे तात्काळ काढून टाकले जाणार असा इशारा दिला होता. भारतीय जनता पक्ष म्हणजे हिंदुत्ववादी आणि हिंदू धर्माच्या रक्षणासाठी झटणारा पक्ष म्हणून त्याची ओळख आहे. अशावेळी नितेश राणे यांनी पक्षाची भूमिका परखडपणे मांडताना हिंदू धर्माच्या विरोधात किंवा हिंदुत्ववादी विचाराच्या आड येणाऱ्या कोणत्याही धर्माच्या धर्म रक्षकांना सूचक इशारा देत आपण आपले योग्य ते काम करा असे सुचविले होते. नामदार नितेश राणे म्हणजे भारतीय जनता पक्षाची राज्यस्तरावरील धडाडती तोफ..! आणि याच तोफेमध्ये कॅबिनेट मंत्रीपद देऊन भारतीय जनता पक्षाने बारूद भरल्यासारखेच केले आहे त्यामुळे भविष्यात महाराष्ट्र राज्यातील राजकारण करताना नामदार नितेश राणे यापेक्षा जहाल वक्तव्य करून परखडपणे व्यक्त होतील आणि हिंदू धर्माच्या रक्षणासाठी रस्त्यावर उतरून काम करतील याबाबत मात्र तीळ मात्र शंका उरलेली नाही.
______________________________
*संवाद मीडिया*
*Admission Open ❗❕Admission Open ❗❕*
2025-26 (STD 6 to 9 & XI Sci.)
*वारस होऊ सैनिकी परंपरेचे…*
https://sanwadmedia.com/156399/
काळानुरूप जलदगतीने बदलत जाणाऱ्या शैक्षणिक गरजा, विज्ञान व माहिती तंत्रज्ञानाच्या
युगात, वाढत्या स्पर्धात्मक जीवनात जिद्दीने आणि महत्वाकांक्षी वृत्तीने यशस्वी होणारे विद्यार्थी
निर्माण करण्याचे पवित्र आणि प्रामाणिक ध्येयरूपी कार्य सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट एक्स सर्व्हिसमेन
असोसिएशन संचलित शासनमान्य सिंधुदुर्ग सैनिक स्कूल, आंबोली गेली 21 वर्षे अविरतपणे करित आहे.
*Admission Open ❗❕Admission Open ❗❕*
2025-26 (STD 6 to 9 & XI Sci.)
*🏆An Award Winning School🏆*
महाराष्ट्रातील एका नामवंत सैनिक शाळेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या पालकांसाठी खुशखबर ..
Sindhudurg District Ex-Servicemen Association, Sindhudurg
संचलित
*📚सिंधुदुर्ग सैनिक स्कूल🏇*
आंबोली, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
💁♂️आता घरबसल्या आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा आपल्या मोबाईलवरुन !📲
👉शैक्षणिक वर्ष 2025 – 26 करिता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासनमान्य अनुदानित ..
👉फक्त मुलांच्या निवासी सैनिक शाळेत इ. ६ वी च्या वर्गासाठी एकूण ४५ जागा व इ. ७ वी ते ११ वी (विज्ञान) मधील काही रिक्त जागांसाठी
प्रवेश प्रक्रिया सुरु
*✨आमची वैशिष्ट्ये✨*
➡️ आदर्श गुरुकुल पद्धतीचे निवासी सैनिकी शिक्षण
➡️ सुरक्षित निसर्गरम्य शालेय परिसर, भव्य क्रिडांगण
➡️आधुनिक व सुसज्ज प्रयोगशाळा, संगणक कक्ष, ग्रंथालय
➡️उच्चशिक्षित अनुभवी शिक्षक व प्रशिक्षक, दर्जेदार शिक्षण
➡️निवासी वैद्यकिय अधिकारी सुविधा
➡️करियर मार्गदर्शन, सैन्यदल प्रवेश परीक्षा, NDA, JEE, NEET, MHT-CET इ. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
➡️NCC Junior Division
📲खालील लिंक वर क्लिक करुन संबंधित माहितीसह फॉर्म सबमिट करावा
👇👇👇👇👇👇
https://forms.gle/vPE7oVGpsLmEUMw68
*www.sindhudurgsainikschool.com*
वरील लिंकवर ऑनलाईन नोंद झालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपूर्व परीक्षेची तारीख आपणांस कळविण्यात येईल.
*💁♂️अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा*
*🏫ऑफिस :*
*📲७८२२९४२०८१*
*📲९४२०१९५५१८*
*दिपक राऊळ : 📲९४२३३०४५१८*
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/156399/
————————————————
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*