You are currently viewing आमदार नितेश राणे यांची कॅबिनेटमंत्री पदी वर्णी; सिंधुदुर्गात जल्लोष..

आमदार नितेश राणे यांची कॅबिनेटमंत्री पदी वर्णी; सिंधुदुर्गात जल्लोष..

वैभववाडी तालुक्याच्या वतीने पदाधिकाऱ्यांनी केले अभिनंदन..

सिंधुदूर्ग :

महाराष्ट्र राज्याच्या मंत्री मंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून कणकवली देवगड वैभववाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांची वर्णी लागल्यानंतर सिंधुदुर्गात भाजपाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. जिल्ह्यात फटाक्यांची आतिषबाजी झाली. दरम्यान जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी नितेश राणे यांचे अभिनंदन करण्यासाठी नागपुरात पोचले. वैभववाडी तालुक्याच्या वतीने पदाधिकारी यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन पुष्गुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे, तालुकाध्यक्ष सुधीर नकाशे, राजेंद्र राणे, संजय सावंत, दिलिप रावराणे, बंटी रावराणे, बंडया मांजरेकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा