सावंतवाडी :
सातोसे येथील देवी माऊली देवस्थानचा वार्षिक जत्रौत्सव मंगळवार दिनांक १७ डिसेंबर रोजी होणार आहे. जत्रौत्सवादिवशी सकाळपासून धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. सुवासिनिंनी ओट्या भरणे, भाविकांची गाऱ्हाणी होणार आहेत. रात्री १२ वाजता पालखी प्रदक्षिणा होणार आहे. त्यानंतर आजगावकर दशावतार मंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. भाविकांनी उपस्थित रहावे असे आवाहन श्री देवी माऊली देवस्थान स्थानिक कमिटीचे अध्यक्ष वसंत धुरी व ग्रामस्थांनी केले आहे.