वेंगुर्ला :
विधानसभा निवडणूकीत उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या उमेदवाराचा पराभव झाल्यामुळे या पराभवाची नैतिक जबाबदारी स्विकारून गेली ६ वर्षे शिवसेनेचे प्रामाणिकपणे काम करणारे ठाकरे शिवसेना पक्षाचे वेंगुर्ले शहर प्रमुख अजित राऊळ यांनी राजीनामा पक्षाचे तालुका प्रमुख यशवंत परब यांचेकडे दिला आहे.गेल्या ६ वर्षात लोकसभा व विधानसभा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीत वेंगुर्ले शहरातील शिवसेना संघटनेची जबाबदारी यशस्वीपणे पेलणारे शहर प्रमुख अजित राऊळ यांनी चालू विधानसभा निवडणुकित प्रामाणिक प्रयत्न करूनही शहरातील मते लोकसभेच्या निवडणुकिपेक्षा घटल्याने या पराभवाची नैतिक जबाबदारी स्विकारून राजीनामा दिलेला आहे. या राजीनाम्यात आपण गेली ६ वर्षे पक्षाचे काम केलेले आहे. या कामात संघटना मजुबुती करणासाठी प्रयत्न केले. या जागी नवोदित क्रियाशील तरूणांना पक्षाने संधी द्यावी. असे सुचित करून आपण ठाकरे शिवसेनेचा कार्यकर्ता म्हणूनच काम करणार असल्याचे राजीनामा पत्रात नमुद केले आहे.