*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी अरुण वी देशपांडे लिखित अप्रतिम काव्यरचना*
।। श्री गुरुदेवदत्त ।।
श्रीदत्तजयंती निमित्ताने श्री दत्त दत्त श्री गुरुवरा ।।
————————————–
स्वामी समर्थ काव्य वंदना ”
या नव्या लेखन-उपक्रमासाठी
श्रीगुरुचरणी प्रार्थना ।।
दत्त दत्त श्रीगुरुवरा तुमच्या कृपेने आले
जीवन माझे आकारा ,ही भावपूजा स्वीकारा ।। १ ।।
समर्थ काव्य वंदना लिहावी,ईच्छा या मना
कृपादृष्टी असो सदा प्रार्थना तव चरणा ।। २ ।।
लेखनसेवा घडावी शब्दातून हो साकार
स्वामीसमर्थांची लीला वर्णण्या द्यावा आधार ।। ३ ।।
समर्थ काव्य वंदना अर्पण करावी चरणा
भक्तवत्सल श्री गुरू पूर्ण करावी कामना ।। ४ ।।
“अरुणदास” कवी हा ,श्रीगुरू नामी रंगला ।।
————————————
कवी- अरुणदास ।।
-अरुण वि.देशपांडे-पुणे
————————————-