*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी चंद्रशेखर कासार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*कृपादृष्टी गुरुरायाची*
दत्तगुरू हे आज प्रकटले
ऋषी अत्रिंच्या दारातून
ब्रम्हा विष्णू महेश जन्मले
अनुसयेच्या उदरातून
त्रिदेवी हून सत्यवती
पतिव्रता श्रेष्ठ जगात
वदिले नारद स्वर्गात
अनुसया नाम घेत
परिक्षेस पात्र त्रिदेवींच्या
प्रसन्न झाले त्रिदेव मुक्त
वरदान देऊन अनुसया
जन्मास आले गुरूदत्त
कामधेनू उभी पाठीशी
चार वेद श्वान रुपात
नवनाथ समर्थ नृसिंह श्रीपाद
अवतरले नाना रुपात
साक्षात्कार मिळे भक्ता
नित्यसेवा गुरुरायाची
कृपादृष्टी भक्तावरी
संकटातून तारण्याची
कवी :-
*चंद्रशेखर प्रभाकर कासार*
*चांदवडकर, धुळे.*
७५८८३१८५४३.