*सुभाषित दिवाळी अंकाला उत्कृष्ट दिवाळी अंकाचे दोन पुरस्कार जाहीर*
नाशिक
सातारा जिल्ह्यातील डाकेवाडी (काळगाव) येथील स्पंदन चॅरीटेबल ट्रस्टने आयोजित केलेल्या स्पंदन दिवाळी अंक स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रातून उत्स्फूर्त आणि उदंड प्रसाद मिळाला आहे स्पर्धेचे हे सहावे वर्ष आहे. महाराष्ट्रातील साहित्यिक सांस्कृतिक परंपरा अखंडपणे जपण्यासाठी स्पंदन दिवाळी अंक स्पर्धा घेतली जाते या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला असून ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर संदीप डाकवे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे. स्पर्धेमध्ये शंभर दिवाळी अंक प्राप्त झाले होते त्यातून नाशिक येथून प्रकाशित होणाऱ्या ‘सुभाषित’ या विनोदी दिवाळी अंकाला स्पंदन उत्कृष्ट दिवाळी अंक हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. या पुरस्काराचे वितरण २१ डिसेंबरला कराड येथे होणार आहे. तसेच पुणे येथील मराठीबोली या संस्थेच्यावतीने घेण्यात आलेल्या दिवाळी अंक स्पर्धेमध्ये ‘सुभाषित’ दिवाळी अंकाला द्वितीय पुरस्कार प्राप्त झालेला आहे. जवळपास दोनशे अंक संस्थेकडे प्राप्त झालेले होते यातून सुभाषित दिवाळी अंकाची द्वितीय पुरस्कारासाठी निवड झाल्याचे मराठीबोलीचे अध्यक्ष परमेश्वर उमरदंड यांनी कळविले आहे. येत्या २९ तारखेला पुरस्कार वितरण समारंभ पुणे येथे होणार आहे. गेल्या चौदा वर्षांमध्ये सुभाषित अंकाला पंचवीस पुरस्कार मिळालेले आहेत. विनोदी दिवाळी अंकांची परंपरा नाशिक मधून पुढे चालवणारा हा राज्यातील वैशिष्ट्यपुर्ण मुखपृष्ठासाठी ओळखला जातो. यापूर्वी अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ,मसाप सोलापूर,रोटरी क्लब, पुणे, अक्षरगंध कल्याण, बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघ, मुंबई मराठी पत्रकार संघ, अंतरराष्ट्रीय दिवाळी अंक संघटना,ठाणे जिल्हा वृत्तपत्र लेखक संघ, मायमराठी गौरव मंच,सृजनदिप पुरस्कार मुर्तिजापूर असे विविध पुरस्कार सुभाषितला मिळालेले आहेत. सुभाषित दिवाळी अंकाचे लेखक, जाहीरातदार, व्यंगचित्रकार आणि मुख्य म्हणजे वाचक यांचे हे यश आहे. या सर्वांच्या सहकार्यामुळेच सुभाषितची वाटचाल मोठ्या दिमाखात सुरू आहे असे प्रकाशक संपादक सुभाष सबनीस यांनी याबाबत बोलतांना सांगितले. भोसलाचे कार्याध्यक्ष ॲड.अविनाश भिडे, नाशिक कवीचे अध्यक्ष इंजी. बाळासाहेब मगर, कुसुमाग्रज मराठी विचार मंचचे अध्यक्ष सतिष बोरा, अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाचे अध्यक्ष विलास पोतदार, ज्येष्ठ्य लेखिका माधुरी माटे, युवा साहित्य संस्थेचे अध्यक्ष किरण सोनार, संपादक नरेन्द्र पाटील, लेखक कवी रविंद्र मालुंजकर, विवेक उगलमुगले यांनी संपादक सुभाष सबनीस यांचे अभिनंदन केले आहे. अशी माहिती दिगंबर काकड यांनी दिली आहे.
_____________________________
*संवाद मीडिया*
*Admission Open ❗❕Admission Open ❗❕*
2025-26 (STD 6 to 9 & XI Sci.)
*वारस होऊ सैनिकी परंपरेचे…*
काळानुरूप जलदगतीने बदलत जाणाऱ्या शैक्षणिक गरजा, विज्ञान व माहिती तंत्रज्ञानाच्या
युगात, वाढत्या स्पर्धात्मक जीवनात जिद्दीने आणि महत्वाकांक्षी वृत्तीने यशस्वी होणारे विद्यार्थी
निर्माण करण्याचे पवित्र आणि प्रामाणिक ध्येयरूपी कार्य सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट एक्स सर्व्हिसमेन
असोसिएशन संचलित शासनमान्य सिंधुदुर्ग सैनिक स्कूल, आंबोली गेली 21 वर्षे अविरतपणे करित आहे.
*Admission Open ❗❕Admission Open ❗❕*
2025-26 (STD 6 to 9 & XI Sci.)
*🏆An Award Winning School🏆*
महाराष्ट्रातील एका नामवंत सैनिक शाळेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या पालकांसाठी खुशखबर ..
Sindhudurg District Ex-Servicemen Association, Sindhudurg
संचलित
*📚सिंधुदुर्ग सैनिक स्कूल🏇*
आंबोली, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
💁♂️आता घरबसल्या आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा आपल्या मोबाईलवरुन !📲
👉शैक्षणिक वर्ष 2025 – 26 करिता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासनमान्य अनुदानित ..
👉फक्त मुलांच्या निवासी सैनिक शाळेत इ. ६ वी च्या वर्गासाठी एकूण ४५ जागा व इ. ७ वी ते ११ वी (विज्ञान) मधील काही रिक्त जागांसाठी
प्रवेश प्रक्रिया सुरु
*✨आमची वैशिष्ट्ये✨*
➡️ आदर्श गुरुकुल पद्धतीचे निवासी सैनिकी शिक्षण
➡️ सुरक्षित निसर्गरम्य शालेय परिसर, भव्य क्रिडांगण
➡️आधुनिक व सुसज्ज प्रयोगशाळा, संगणक कक्ष, ग्रंथालय
➡️उच्चशिक्षित अनुभवी शिक्षक व प्रशिक्षक, दर्जेदार शिक्षण
➡️निवासी वैद्यकिय अधिकारी सुविधा
➡️करियर मार्गदर्शन, सैन्यदल प्रवेश परीक्षा, NDA, JEE, NEET, MHT-CET इ. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
➡️NCC Junior Division
📲खालील लिंक वर क्लिक करुन संबंधित माहितीसह फॉर्म सबमिट करावा
👇👇👇👇👇👇
https://forms.gle/vPE7oVGpsLmEUMw68
*www.sindhudurgsainikschool.com*
वरील लिंकवर ऑनलाईन नोंद झालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपूर्व परीक्षेची तारीख आपणांस कळविण्यात येईल.
*💁♂️अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा*
*🏫ऑफिस :*
*📲७८२२९४२०८१*
*📲९४२०१९५५१८*
*दिपक राऊळ : 📲९४२३३०४५१८*
*जाहिरात लिंक*👇
————————————————
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*