You are currently viewing सावंतवाडी न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतीचे यशस्वी आयोजन

सावंतवाडी न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतीचे यशस्वी आयोजन

*सावंतवाडी न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतीचे यशस्वी आयोजन*

*प्रलंबित व वादपुर्व अशी एकूण ३४९ प्रकरणे निकाली
एकूण ११ लाख ४६ हजार १४३ रक्कम वसूल*

*सावंतवाडी*

तालुका विधी सेवा समिती सावंतवाडी तर्फे शनिवार दिनांक १४ डिसेंबर रोजी दिवाणी न्यायालय सावंतवाडी येथे राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करुन लोकअदालतीच्या कामकाजाची सुरुवात करण्यात आली.

यावेळी श्रीम. जे. एम. मिस्त्री दिवाणी न्यायाधीश क. स्तर सावंतवाडी तथा अध्यक्ष, तालुका विधी सेवा समिती सावंतवाडी, श्रीम.आर.जी. कुभांर, सहदिवाणी न्यायाधीश, क.स्तर सावंतवाडी वकील श्री. स्वप्नील कोलगांवकर, बँक अधिकारी, म.रा.वि.वि. कंपनी अधिकारी, ग्रामसेवक, बी.एस.एन.एल. अधिकारी, श्रीम. ओ.यु.शेख सहा. अधी. (प्रशा.) सौ. अडुळकर व. लिपीक, सौ. व्ही.ओ. देसाई, लघुलेखक, श्री. संतोष राऊळ,व. लिपीक, श्री. दिवाकर सावंत, क. लिपीक सौ. मराठे क. लिपीक, श्रीम. नाईक क. लिपीक, सौ. ओटवणेकर क. लिपिक सौ. डिसोजा क. लिपिक श्री.देसाई क. लिपिक, श्री. अभय चव्हाण, सौ. रश्मी शिरसाट न्यायालयीन कर्मचारी यांनी सहभाग घेतला.

लोक अदालतीमध्ये दिवाणी व फौजदारी कडील २९ प्रकरणे, तसेच ग्रामपंचायत, बी.एस.एन.एल. बँक, म.रा.वि.वि. कंपनी यांचे कडील एकूण प्रकरणे ३२० वादपुर्व प्रकरणे मिटविण्यात आली निकाली प्रकरणांव्दारे सुमारे ११ लाख ४६ हजार एकशे त्रेचाळीस ऐवढी रक्कम सामोपचाराने भरणा करण्यात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा