*दि.१७ रोजी वैभववाडी येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर*
वैभववाडी
सध्याच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या शारीरिक समस्येने ग्रस्त आहे. त्याची योग्य वेळी माहिती होण्यासाठी आणि पुढील धोका टाळण्यासाठी मंगळवार दिनांक १७ डिसेंबर रोजी आरोग्य क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केलेल्या माधवबाग शाखा कणकवली यांचे मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले आहे.
या शिबिरामध्ये हृदयरोग, मधुमेह, ब्लडप्रेशर, हाय कोलेस्ट्रॉल, ब्लॉकेजेस, मानसिक ताणतणाव, सांधेदुखी, पित्ताचा त्रास, थायरॉईड लठ्ठपणा, ॲन्जिओग्राफी, ॲन्जिओप्लास्टी आणि बायपास केलेल्या किंवा सुचवलेल्या रुग्णांची मोफत तपासणी करण्यात येणार आहे.
ईसीजी, रँडम शुगर, डॉक्टर कन्सल्टेशन, बीपी,एसपीओ-२ व आहाराविषयी मोफत सल्ला मिळणार आहे. आवश्यकता असल्यास योग्य दरात औषधे मिळणार आहेत.
सदर मोफत आरोग्य तपासणी शिबिर वैभववाडी तालुका व्यापारी संघ, रिक्षा चालक-मालक संघटना वैभववाडी, ज्येष्ठ नागरिक संघ वैभववाडी आणि ग्राहक पंचायत महाराष्ट्र, तालुका शाखा वैभववाडी यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दिनांक १७ डिसेंबर रोजी सकाळी ९.३० ते १.३० या वेळेत दत्त विद्यामंदिर वैभववाडी शाळा नंबर १ येथे आयोजित केले आहे. या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी श्री. तेजस आंबेकर
(7744058315), श्री.राजेश सरवणकर (9420206416), श्री.शांताराम रावराणे (9422821614), श्री.इद्रजित परबते (7028835028) यांच्याशी संपर्क साधावा.