You are currently viewing पाककौशल्यात विद्यार्थिंनींइतकेच विद्यार्थीही सरस

पाककौशल्यात विद्यार्थिंनींइतकेच विद्यार्थीही सरस

*पाककौशल्यात विद्यार्थिंनींइतकेच विद्यार्थीही सरस*

पिंपरी

क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती संचलित क्रांतिवीर चापेकर माध्यमिक आणि उच्चमाध्यमिक विद्यालय, चिंचवडगाव येथे शनिवार, दिनांक १४ डिसेंबर २०२४ रोजी आयोजित करण्यात आलेल्या पाककला स्पर्धेत विद्यार्थिंनीबरोबर विद्यार्थ्यांनी हिरिरीने सहभागी होत पाककौशल्यात आपणही सरस असल्याचे सिद्ध केले. क्रीडा स्पर्धांतर्गत शेवटच्या दिवशी पाककला स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थिनी आणि विद्यार्थ्यांचे वेगवेगळे दहा गट यामध्ये सहभागी झाले होते. तीन दगडांची चूल मांडून, शिधा आणि पूरक साहित्य सोबत घेऊन खिचडी, पुलाव, पराठे, भजी, पोळीभाजी या नेहमीच्या जेवणातील पदार्थांसोबतच मिष्टान्न तयार करून आपण भावी काळातील सुगरणी आणि बल्लवाचार्य असल्याचे सहभागींनी सिद्ध केले.

याबाबत अधिक माहिती देताना मुख्याध्यापिका वर्षा जाधव म्हणाल्या की, “स्त्री – पुरुष समानतेच्या आजच्या काळात स्त्री ही पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून अर्थार्जनासाठी घराबाहेर पडते. त्यामुळे स्वयंपाक ही फक्त स्त्रीची जबाबदारी न राहता पुरुषांनीदेखील त्यात पारंगत व्हावे, ही काळाची गरज आहे. त्यासाठी १९९५ पासून सुमारे २९ वर्षे ही स्पर्धा विद्यालयात घेण्यात येते. स्पर्धेतील विजेत्यांना प्रजासत्ताक दिन सोहळ्यात विविध बक्षिसे प्रदान करून सन्मानित करण्यात येते!”

सहायक पोलीस निरीक्षक विठ्ठल करंबळकर आणि पोलीस अंमलदार देवेंद्र ढवळे यांनी परीक्षण केले. राजश्री पाटील, सुलभा झेंडे, शुभांगी बडवे, दीपाली शिंदे या वर्गशिक्षिकांसह विद्यालयाचे सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारीवर्ग यांनी
संयोजनात सहकार्य केले.

– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२

______________________________
*संवाद मीडिया*

*Admission Open ❗❕Admission Open ❗❕*
2025-26 (STD 6 to 9 & XI Sci.)

*वारस होऊ सैनिकी परंपरेचे…*

काळानुरूप जलदगतीने बदलत जाणाऱ्या शैक्षणिक गरजा, विज्ञान व माहिती तंत्रज्ञानाच्या
युगात, वाढत्या स्पर्धात्मक जीवनात जिद्दीने आणि महत्वाकांक्षी वृत्तीने यशस्वी होणारे विद्यार्थी
निर्माण करण्याचे पवित्र आणि प्रामाणिक ध्येयरूपी कार्य सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट एक्स सर्व्हिसमेन
असोसिएशन संचलित शासनमान्य सिंधुदुर्ग सैनिक स्कूल, आंबोली गेली 21 वर्षे अविरतपणे करित आहे.

*Admission Open ❗❕Admission Open ❗❕*
2025-26 (STD 6 to 9 & XI Sci.)

*🏆An Award Winning School🏆*
https://sanwadmedia.com/156399/

महाराष्ट्रातील एका नामवंत सैनिक शाळेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या पालकांसाठी खुशखबर ..

Sindhudurg District Ex-Servicemen Association, Sindhudurg
संचलित
*📚सिंधुदुर्ग सैनिक स्कूल🏇*
आंबोली, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

💁‍♂️आता घरबसल्या आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा आपल्या मोबाईलवरुन !📲

👉शैक्षणिक वर्ष 2025 – 26 करिता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासनमान्य अनुदानित ..
👉फक्त मुलांच्या निवासी सैनिक शाळेत इ. ६ वी च्या वर्गासाठी एकूण ४५ जागा व इ. ७ वी ते ११ वी (विज्ञान) मधील काही रिक्त जागांसाठी
प्रवेश प्रक्रिया सुरु

*✨आमची वैशिष्ट्ये✨*

➡️ आदर्श गुरुकुल पद्धतीचे निवासी सैनिकी शिक्षण
➡️ सुरक्षित निसर्गरम्य शालेय परिसर, भव्य क्रिडांगण
➡️आधुनिक व सुसज्ज प्रयोगशाळा, संगणक कक्ष, ग्रंथालय
➡️उच्चशिक्षित अनुभवी शिक्षक व प्रशिक्षक, दर्जेदार शिक्षण
➡️निवासी वैद्यकिय अधिकारी सुविधा
➡️करियर मार्गदर्शन, सैन्यदल प्रवेश परीक्षा, NDA, JEE, NEET, MHT-CET इ. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
➡️NCC Junior Division

📲खालील लिंक वर क्लिक करुन संबंधित माहितीसह फॉर्म सबमिट करावा
👇👇👇👇👇👇
https://forms.gle/vPE7oVGpsLmEUMw68

*www.sindhudurgsainikschool.com*
वरील लिंकवर ऑनलाईन नोंद झालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपूर्व परीक्षेची तारीख आपणांस कळविण्यात येईल.

*💁‍♂️अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा*

*🏫ऑफिस :*
*📲७८२२९४२०८१*
*📲९४२०१९५५१८*
*दिपक राऊळ : 📲९४२३३०४५१८*

*जाहिरात लिंक*👇
————————————————
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा