दारू वाहतूक प्रकरणी आंध्र प्रदेश येथील एक ताब्यात…
सावंतवाडी पोलिसांची कारवाई; दारूसह १० लाख १६ हजाराचा मुद्देमाल जप्त…
सावंतवाडी
बेकायदा गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी सावंतवाडी पोलिसांनी आंध्रप्रदेश येथील एकाला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून २ लाख १६ हजाराच्या दारूसह ८ लाखाची गाडी असा एकूण १० लाख १६ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. व्यंकटेश श्रीनिवासूलू वद्दी (वय २८) असे त्याचे नाव आहे. ही कारवाई काल रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास आंबोली चेक पोस्ट येथे सावंतवाडी पोलिसांकडून करण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी की, आंबोली चेक पोस्ट येथे वाहनांची तपासणी करत असताना व्यंकटेश याच्या गाडीत बेकायदा गोवा बनावटीची दारू आढळून आली. याप्रकरणी त्याला ताब्यात घेण्यात आली असून त्याच्याकडून २ हजार १६ हजाराची दारू व ८ लाखाची गाडी असा एकूण १० लाख १६ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई प्रभारी अधिकारी संजय कातिवले, पोलीस हवालदार दत्तात्रय देसाई, दीपक शिंदे, मनीष शिंदे, राजेश नाईक आदींच्या पथकाकडून करण्यात आले.