You are currently viewing अवतार दत्तगुरूंचा….

अवतार दत्तगुरूंचा….

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री उज्ज्वला सहस्त्रबुद्धे लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*अवतार दत्तगुरूंचा…..*

 

श्री दत्तगुरु अवतारा ,

त्रिगुणात्मक जगतारका !

अवतरला तुम्ही जगती ,

तारण्या सकल दुःखकारका!….१

 

उत्पत्ती, स्थिती, लय जाणू,

त्रिगुण हे या जगताचे !

ब्रह्मा,विष्णू, महेश ,

साक्षी भूत त्या लीलेचे !…..२

 

सती अनुसये चे सत्व ,

इथे लागले पणाला !

तिन्ही बालके सृष्टीची ,

जागवले तिने मातृत्वाला!….३

 

गौरव झाला जगी या,

अनुसया मातृभावाचा !

दिगंबरा तुझा अवतार,

न्याय देई अजब हा साचा!…४

 

उज्वला सहस्रबुद्धे, पुणे

प्रतिक्रिया व्यक्त करा