समाज मंदिर येथील नगरपरिषद कर्मचारी वसाहतीमधील शौचालयांची माजी नगरसेवक दीपक पाटकर यांनी केली स्वखर्चाने दुरुस्ती
मालवण :
मालवण शहरातील समाज मंदिर येथील नगरपरिषद कर्मचारी वसाहतीमधील शौचालयांची दुरावस्था झाली होती. कर्मचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत होता. याबाबत माहिती मिळताच माजी नगरसेवक दीपक पाटकर यांनी स्वखर्चातून या शौचालयाची दुरुस्ती करून दिली. याबद्दल कर्मचाऱ्यांच्या वतीने दीपक पाटकर यांचे आभार मानण्यात आले.
जनतेची सेवा सतत आपल्या हातून घडत राहिली पाहिजे हे राणेसाहेब आम्हा कार्यकर्त्यांना नेहमीच सांगतात. त्यानुसार आमदार निलेश राणे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली जनसेवा करण्याचा प्रयत्न आमचा असतो. आम्ही मोठे काही केले नाही मालवण शहर वासियांच्या सेवेसाठी नेहमीच तत्पर राहणार असल्याचे दीपक पाटकर यांनी यां निमित्ताने सांगितले. यावेळी महेश सारंग, ललित चव्हाण यांसह अन्य सहकारी उपस्थित होते.
नगरपरिषद कर्मचारी वसाहत याठिकाणी शौचालय इमारतीची पडझड होत होती. दरवाजा नादुरुस्त झाले होते. कर्मचारी यांची समस्या लक्षात घेता तातडीने दीपक पाटकर यांनी दुरुस्ती केली. प्रशासन स्तरावर याबाबत कार्यवाही होते. मात्र तातडीने दुरुस्ती आवश्यक असल्याने त्यानुसार दुरुस्ती करून घेतल्याचे दीपक पाटकर यांनी सांगितले.