*सिंधुदुर्ग जिल्ह्यात मसिआच्या विस्तारीकरणासाठी सामुहिक प्रयत्न आवश्यक*
मसिआचे माजी अध्यक्ष श्री आशिश पेडणेकर यांचे प्रतिपादन..
महाराष्ट्र चेंबर आॅफ काॅमर्स व इंडस्ट्री अॅन्ड अॅग्रीकल्चरच्या माध्यमातून उद्योग, पर्यटन, आरोग्य,कृषी दळणवळण या सर्वच क्षेत्रात व्यापक विचार करुन सर्व घटकांच्या एकात्मिक सहभागातून विकासाच्या संकल्पना राबवणे आवश्यक आहे. प्रत्येकवेळी सरकारवरचं अवलंबून न रहाता मुळातचं प्रतिभावंत असलेल्या कोकणी माणसाने परस्पर सहकार्याने विकासाच्या वाटा आपणच शोधल्या पाहिजेत असे प्रतिपादन महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अॅड अॅग्रीकल्चरचे माजी अध्यक्ष व जेष्ठ सल्लागार श्री आशिश पेडणेकर यांनी केले.
कुडाळ येथे मसिआच्या गव्हर्निंग कौन्सिलच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी कोकणचे सुपूञ आणि मसिआचे कोकण विभागीय अध्यक्ष डॉ. श्रीकृष्ण परब यांनी कोकणातील उद्योजकांच्या प्रलंबित समस्या बाबत मसिआ गांभीर्याने विचार करत असून मसिआचे अध्यक्ष मा. ललित गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली त्या त्या विभागाशी पाठपुरावा करत असल्याचे सांगितले.
सदस्य श्री शिवाजी घोगळे व श्री मनोज वालावलकर यांनी ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांच्या समस्या मांडल्या. प्रसार माध्यमे व संवाद समितीचे को- चेअरमन अॅड. नकुल पार्सेकर यांनी कुडाळ औद्योगिक वसाहतीतील अनेक उद्योजकांना आवश्यक विद्युतपुरवठा होत नसल्याने तसेच नव उद्योजकांना नवीन पुरवठा वीज वितरण कंपनीला शक्य नसल्याने नवीन उपकेंद्र लवकरात लवकर होण्यासाठी मसिआने प्रयत्न करावेत असे आवाहन केले.
नजिकच्या काळात सिंधुदुर्ग जिल्ह्यात मसिआ व इतर संस्थाच्या सहकार्याने मायटेक्स २०२५ च्या आयोजना बाबत सविस्तर चर्चा झाली. यामध्ये श्री नितीन वाळके, राजन नाईक, विजय केनवडेकर, गुरुनाथ राणे, रंजन चिके,दत्तप्रसाद पेडणेकर, संजय वराडकर, कृष्णा साळसकर आदिनी सहभाग घेऊन आपापल्या सुचना मांडल्या. उद्योगजकानां एक नवी उर्जा व योग्य दिशा देण्यासाठी मायटेक्स २०२५ चे प्रभावी आयोजन करण्याबाबत सविस्तर चर्चा झाली.