You are currently viewing परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील घटनेचा सिंधुदुर्गात निषेध

परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील घटनेचा सिंधुदुर्गात निषेध

परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील घटनेचा सिंधुदुर्गात निषेध

जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग आणि मा. पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग यांचेकडे निवेदन सादर

सिंधुदुर्ग

परभणी जिल्हाधिकारी कार्यालयामोरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या जवळील जगातील सर्वात मोठे असा गौरव केले जाणाऱ्या भारतीय संविधानाच्या प्रतिकृती च्या प्रतीची मंगळवारी १० डिसेंबर रोजी संध्याकाळी सोपान दत्तराव पवार या व्यक्तीने विटंबना केली. या घटनेचे तीव्र पडसाद राज्यभारत उमटत आहे. ही घटना निंदनीय आहे याचा आम्ही निषेध करत आहोत. या घटनेचा जलद गतीने तपास करून दोषीवर कारवाई व्हावी अशी मागणी मा. जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग आणी मा. पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग यांचेकडे निवेदन देऊन करणेत आली आहे.तसेच हा संविधानाचा केलेला अवमान आहे.त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा अनुसूचित जाती मोर्चा (भा. ज. पा.) च्या वतीने या घटनेचा निषेध व्यक्त करणेत आला. यावेळी भा. ज. प. सिंधुदुर्ग अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष श्री. नामदेव जाधव सिंधुदुर्ग भा ज प चे जिल्हा चिटणीस श्री. चंद्रकांत जाधव व अनुसूचित जाती मोर्चा चे सर्व जिल्हा पदाधिकारी व मंडळ अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा