You are currently viewing कारण माणंस वागत नाहीत मा ण सा सा र खी

कारण माणंस वागत नाहीत मा ण सा सा र खी

*कारण माणंस वागत नाहीत मा ण सा सा र खी*
जीवनाच्या वाटेवर
साथ देतात,
मात करतात,
हात देतात,
घात करतात,
ती ही असतात….. *माणसं !*

संधी देतात,
संधी साधतात,
आदर करतात,
भाव खातात
ती ही असतात….. *माणसं !*

वेडं लावतात,
वेडं ही करतात,
घास भरवतात,
घास हिरावतात
ती ही असतात….. *माणसं !*

पाठीशी असतात,
पाठ फिरवतात,
वाट दाखवतात ,
वाट लावतात
ती ही असतात….. *माणसं !*

शब्द पाळतात,
शब्द फिरवतात,
गळ्यात पडतात,
गळा कापतात
ती ही असतात …… *माणसं !*

दूर राहतात,
तरी जवळचीच वाटतात,
जवळ राहून देखील,
परक्यासारखी वागतात
ती ही असतात …… *माणसं !*

नाना प्रकारची अशी
नाना माणसं,
ओळखायचीत कशी……………..
*सारी असतात आपलीच माणसं !*
*संग्रह@ अजित नाडकर्णी,संवाद मिडीया.✒️✒️✒️✒️✒️✒️✒️😄😃😁😆🥹😀*

प्रतिक्रिया व्यक्त करा