You are currently viewing राज्यस्तरीय मराठी बालनाट्य स्पर्धेतील प्राथमिक फेरीत वामनराव महाडिक हायस्कूलचे सुयश : अंतिम फेरीत प्रवेश

राज्यस्तरीय मराठी बालनाट्य स्पर्धेतील प्राथमिक फेरीत वामनराव महाडिक हायस्कूलचे सुयश : अंतिम फेरीत प्रवेश

राज्यस्तरीय मराठी बालनाट्य स्पर्धेतील प्राथमिक फेरीत वामनराव महाडिक हायस्कूलचे सुयश : अंतिम फेरीत प्रवेश

विशेष लक्षवेधी अभिनय नैपुण्य पदकानेही गौरव

तळेरे :
तळेरे येथील वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी जे. ई. एस. शिक्षण संकुल जोगेश्वरी (पूर्व) मुंबई येथील जोगेश्वरी एज्युकेशन सोसायटी आयोजित कै. विकास धुमे स्मरणार्थ जे. ई. एस. करंडक स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत यश मिळविले आहे. या स्पर्धेत राज्यभरातून स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेत तळेरे विद्यालयाच्या आये या एकांकिकेने तृतीय क्रमांक मिळवीत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला आहे.

स्वतःला विसरून मुलांना घडविणारी, तयांच्यावर संस्कार करणारी असते ती आई. मुलांचे आयुष्य मार्गी लागावे म्हणून अहोरात्र झटणारी व्यक्ती म्हणजे आई. आणि हाच विषय घेऊन वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, तळेरे प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय मराठी बालनाट्य स्पर्धेत सहभाग घेत यश खेचून आणले. या स्पर्धेत राज्यभरातून जवळपास 40 एकांकिका संघ स्पर्धेसाठी सहभागी झाले होते. विशेष म्हणजे ग्रामीण भागातून सहभागी होणारी एकमेव एकांकिका ही वामनराव महाडिक हायस्कूलची होती.

या एकांकिकेत प्रशालेतील शमिका ढेकणे, मयुरेश जठार, श्रेया कुट्रे, सलोनी तोरस्कर, रक्षा भोगले, हर्षिता तडवी, प्रेरणा तळेकर, वेदिका भोगले, अनुष्का चव्हाण, मयुरेश तळेकर, प्रथम तळेकर, दिव्यांशू पिसे, ईश्वरी खटावकर, मयूर मेस्त्री, शुभम साटम, आर्यन पांचाळ, तपस्वी नाईकधुरे, सत्यवान गावकर, वेदांत जंगले, शैलेश बडमे, राज घाडी हे विद्यार्थी सहभागी झाले होते.

विशेष लक्षवेधी अभिनय नैपुण्य पदक (चौकट)
या एकांकिकेमध्ये प्रमुख “आये” ची भुमिका करणारी शमिका ढेकणे व मुलाची भुमिका करणार्या मयुरेश जठार या दोघांनाही विशेष लक्षवेधी अभिनय नैपुण्य पदक प्राप्त झाले आहे.

या प्रशालेला नेहमी सहकार्य करणारे लेखक, दिग्दर्शक शेखर गवस यांच्या प्रयत्नातून या नाटिकेला कलाटणी मिळाली व ती राज्यस्तरीय स्पर्धेत यशस्वी ठरली. प्रथम फेरीमध्ये या नाटिकेला सुयश प्राप्त झाले असून या स्पर्धेची अंतिम फेरी 25 डिसेंबर रोजी मुंबई येथे पार पडणार आहे.

या स्पर्धेतील यशाबद्दल संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकृष्ण खटावकर, शाळा समिती चेअरमन अरविंद महाडिक, प्रशालेचे प्राचार्य अविनाश मांजरेकर, सर्व शाळा समिती सदस्य, सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी वृंद, पालक ग्रामस्थ, माजी विद्यार्थी यांनी अभिनंदन करत या नाटिकेच्या अंतिम फेरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

छायाचित्र :
जे. ई. एस. शिक्षण संकुल जोगेश्वरी (पूर्व) मुंबई येथील जोगेश्वरी एज्युकेशन सोसायटी आयोजित कै. विकास धुमे स्मरणार्थ जे. ई. एस. करंडक स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत यश मिळविल्या बद्दल संस्था पदाधिकारी आणि सर्व शिक्षक यांच्यावतीने या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा