खासकीलवाडा येथील युवकाचा मोती तलावात आढळला मृतदेह…
सावंतवाडी
येथील न्यू खासकीलवाडा परिसरात राहणाऱ्या युवकाचा येथील मोती तलावात मृतदेह आढळून आला. राजेश चंद्रकांत पाटकर (वय ५५, सध्या रा. पिंगुळी) असे त्याचे नाव आहे. त्याने आत्महत्या केली असावी, असा अंदाज पोलीसांनी व्यक्त केला आहे. ही घटना आज सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.