You are currently viewing सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या पुढाकारातून मागच्या वर्षी महोत्सव झाला यावर्षी महोत्सव होणार का?

सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या पुढाकारातून मागच्या वर्षी महोत्सव झाला यावर्षी महोत्सव होणार का?

सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या पुढाकारातून मागच्या वर्षी महोत्सव झाला यावर्षी महोत्सव होणार का?

शहरवासीयांमध्ये उत्सुकता – रवी जाधव

सावंतवाडी

मागच्या वर्षी सामाजिक बांधिलकीच्या पुढाकारातून माननीय मंत्री दीपक भाई केसरकर मित्र मंडळ पुरस्कृत सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान, इनरव्हील क्लब व रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमानाने सहा दिवस मनोरंजनात्मक कार्यक्रम घेऊन अगदी उत्साहात महोत्सव पार पडला.
आज १२ डिसेंबर उजाडला परंतु महोत्सव होण्याबाबतची चर्चा कुठेही होताना दिसत नाही व्यापारी वर्ग व शहरवासीयां कडून सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानला विचारणी होत आहे की यावेळी महोत्सव घेणार का?
तरी याहि वर्षी नव्या वर्षाच्या स्वागतासाठी व शहरवासीयांच्या आनंदोत्सवासाठी माननीय आमदार दीपक भाई केसरकर यांनी मोठ्या दिमाखात मनोरंजनात्मक कार्यक्रमांचा महोत्सव घेऊन व्यापारी वर्ग व शहरवासीयांची इच्छा पूर्ण करावी अशी मागणी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या माध्यमातून रवी जाधव यांनी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा