*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी चंद्रशेखर कासार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*नवप्रभा*
पुन्हा नव्याने छेडत जाऊ
तुटलेल्या भंगलेल्या तारा
जगण्याची उमेद जागवू
वादळातही शोधू किनारा
अंधुक झाला प्रकाश जरी
वाट पाहू नव्या सकाळची
मावळतीला दिप विझला
दिशा उगवेल नव प्रभेची
संकट आले संकट गेले
कुणा वाचून काय राहिले
माझे तुझे आपणच केले
जीवन सुंदर कुणा कळले
दोन आसवे गळले जरी
स्वच्छंदी मुक्तकंठी हसावे
जगून घ्यावे छान आयुष्य
स्वच्छ मनमोकळे रहावे
कवी:-
*चंद्रशेखर प्रभाकर कासार*
*चांदवडकर, धुळे.*
७५८८३१८५४३.