You are currently viewing मायग्रेन ही डोकेदुखी आजार ठरू शकतो चिंतेची बाब…..जाणून घ्या लक्षण 

मायग्रेन ही डोकेदुखी आजार ठरू शकतो चिंतेची बाब…..जाणून घ्या लक्षण 

 

मायग्रेन ही डोकेदुखीची समस्या आजकाल मोठे कठीण रुप धारण करीत आहे. सुरुवातीला केवळ डोकेदुखी म्हणून केलेल्या दुर्लक्षामुळे अनेक जण मायग्रेनचा त्रास वाढल्यानंतर मानसिक रोगांना बळी पडतात, असे उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे मायग्रेनमुळे होणा-या मानासिक विकारांमध्ये पुरुषांपेक्षा महिला अधिक प्रमाणात बळी पडतात, असेही दिसून आले आहे.

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (एम्स) च्या भोपाळमधील न्यूरोलॉजी विभागात झालेल्या अभ्यासात ही बाब उघडकीस आली आहे. संस्थेने मायग्रेनने ग्रस्त १३२ रुग्णांवरील अभ्यासानंतर हे निष्कर्ष मांडले आहेत. १३२ रुग्णांमधील ५३ टक्के रुग्ण हे नैराश्याचे (डिप्रेशन) बळी ठरतात, असे दिसून आले आहे. त्याशिवाय तणावग्रस्त (५२ टक्के)व चिंताग्रस्त (६६ टक्के) असलेले रोगीही मोठ्या प्रमाणात सापडले आहेत. बहुतांश रोग्यांमध्ये दोन प्रकारचे मानसिक रोग दिसून आले आहेत. महिलांसाठी धक्कादायक बाब म्हणजे सर्वेक्षणात सामील असणा-या रोग्यांमध्ये १३२ पैकी ११० महिला होत्या. याचा अर्थ मायग्रेन व त्यामुळे मानसिक रोगांना बळी पडणा-यांमध्ये महिलांचे प्रमाण पुरुषांपेक्षा खूप जास्त असते, असे दिसून आले आहे.

इस अध्ययन के मुख्य शोधकर्ता एम्स भोपाल च्या न्यूरोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. नीरेंद्र कुमार राय यांच्या नेतृत्वाखाली हे सर्वेक्षण करण्यात आले. आपल्या संशोधनाबद्दल सांगताना राय यांनी ही देशातील नवीन ये घातलेली समस्या असून मायग्रेनमुळे मानसिक रोगांना बळी पडण्याचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे. मात्र अद्यापही याबाबत देशात गांभीर्याने संशोधन होत नसल्याची खंत व्यक्त केली आहे. आम्ही केलेल्या संशोधनामुळे मायग्रेनग्रस्त रुग्णांना मानसिक रोग टाळण्यासाठी वेळीच उपचार करणे शक्य होईल, असे त्यांचे म्हणणे आहे. सर्वेक्षणातील सहभागी रुग्णांचे सरासरी वय ३३ वर्ष होते व त्यांना साधारणपणे ७ वर्षांपासून मायग्रेनचा त्रास होत असल्याचे सांगण्यात आले.

 

*मायग्रेनची लक्षणे*

-वारंवार डोकेदुखीचा त्रास

-डोक्याचा कोणत्याही भागात अचानक डोकेदुखी

– ३-४ तास त्रास

– उल्टी होईल असे वाटणे

– डोके दुखत असताना थोडासाही आवाज सहन न होणे

 

*दररोज २५ रोग्यांमध्ये लक्षणे*

भोपाळमधील गांधी मेडिकल कॉलेज (जीएमसी)च्या मनोचिकित्सा विभागातील माजी प्रमुख डॉ. आर.एन.साहू यांनी दिलेल्या माहितीनूसार एकट्या भोपाळमध्ये मायग्रेनमुळे मानसिक रोगाचे दररोज २५ रुग्ण डॉक्टरांकडे येत आहेत.

 

 

*मायग्रेनमुळे होणा-या मानसिक व्याधी*

तणाव : यात चिंता, निराशा, नकारात्मक विचार, आत्महत्याचे विचार, खूप जास्त झोप किंवा निद्रानाश

चिंताग्रस्तता -भीती वाटणे, हृद्याची धडधड वाढणे, घाम व वारंवार लघवी येणे, हात पाय थरथरणे

तणावग्रस्तता – डोकेदुखी, तणाव,निद्रानाश

 

*”काय काळजी घ्यावी”*

महिन्यातून ४ पेक्षा अधिक वेळा डोकेदुखी होत असल्यास डॉक्टरांशी संपर्क

-मायग्रेन वाढेल अशा बाबींपासून दूर रहावे.उदा. उपाशी राहणे, पुरेशी झोप न घेणे आदी.

प्रतिक्रिया व्यक्त करा