You are currently viewing वेंगुर्ले येथे १५ डिसेंबर ला “साने गुरूजी शिक्षक साहित्य संमेलना”चे आयोजन

वेंगुर्ले येथे १५ डिसेंबर ला “साने गुरूजी शिक्षक साहित्य संमेलना”चे आयोजन

वेंगुर्ले येथे १५ डिसेंबर ला “साने गुरूजी शिक्षक साहित्य संमेलना”चे आयोजन

वेंगुर्ले

साने गुरूजी यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त १५ डिसेंबर रोजी सकाळी ९ ते सायं. ५ या वेळेत वेंगुर्ला येथील परूळेकर दत्तमंदिरात बॅ.नाथ पै सेवांगण मालवण आणि मुक्तांगण वेंगुर्ला यांच्या वतीने “साने गुरूजी शिक्षक साहित्य संमेलन २०२४” चे आयोजन करण्यात आले आहे.

या संमेलनाचे उद्घाटन जिल्हापरिषद सिधुदुर्गचे प्राथमिक शिक्षणाधिकारी गणपती कमळकर यांच्या हस्ते होणार असून यावेळी ज्येष्ठ साहित्यिका वृंदा कांबळी, रमेश पिगुळकर, रमण किनळेकर, एम.पी.मेस्त्री, सत्यवान पेडणेकर, कैवल्य पवार, विठ्ठल कदम, वीरधवल परब आदी उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर अॅड.देवदत्त परूळेकर यांचे ‘साने गुरूजी समजून घेताना‘ यावर व्याख्यान, दु.१२.१५ वा. ‘कथा साने गुरूजींच्या‘ हा कथाकथनाचा कार्यक्रम होणार असून यात भरत गावडे, शामल मांजरेकर, वंदना सावंत, प्राजक्ता आपटे, देवयाने आजगांवकर, महेश बोवलेकर आदी सहभागी होणार आहेत. दु. २.३० ते ४ या वेळेत प्रा.मोहन कुंभार (कणकवली) यांच्या अध्यक्षतेखाली होणा-या कवी संमेलनात सरिता पवार, कल्पना मलये, श्वेतल परब, शालिनी मोहोळे, प्रज्ञा मातोंडकर, नीलम यादव, ऋतुजा सावंत, योगिता सातपुते, प्राजक्ता आपटे, प्रमिता तांबे, प्रतिभा चव्हाण, राजेश कदम, सिद्धार्थ तांबे, मनोहर परब, किशोर कदम, किशोर वालावलकर, योगेश सकपाळ, रामा पोळजी, संजय घाडी, पांडुरंग कौलापूरे, सुनिल गोंधळी, अजित राऊळ आदी कवी यात सहभागी होणार आहेत. याचे सूत्रसंचालन राजेश कदम करतील.

या शिक्षक साहित्य संमेलनाला संतोष परब, एकनाथ जानकर, सीताराम नाईक, कर्पूरगौर जाधव, झिलू घाडी, विनोद मेतर, त्रिबक आजगांवकर, कालिदास खानोलकर, अमेय देसाई, वैभव खानोलकर, रामचंद्र मळगांवकर, एकनाथ कांबळे, प्रतिमा पेडणेकर, प्रमिला राणे, रेश्मा वरसकर, राजश्री घोरपडे, नीना मार्गी, गंधाली मळीक, समृद्धी पेडणेकर, विजय ठाकर, सुनिल जाधव, देवयानी आजगांवकर, चित्रा प्रभूखानोलकर, विद्याधर कडुलकर, पांडुरंग सामंत, दिलीप प्रभूखानोलकर, विनायक प्रभू, जया प्रभू, विशाखा वेंगुर्लेकर, वर्षा मोहिते आदी उपस्थित राहणार आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा