You are currently viewing वनवास

वनवास

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी रामदास आण्णा लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*वनवास*

 

एक वचनावरून, राजमहाल सोडला

एक परम भक्त भाऊ, त्रेतायुगात घडला

 

वनवास घेतला त्यांनी, पित्याचे वचन पाळले

मनुष्य जन्म काय हे, देवाला वनात कळले

 

रामाच्या जीवनी, असा प्रकार घडला

राम सुद्धा वनामध्ये, सितेसाठी रडला

 

बंधु प्रेम असे जिथे, उर्मिला मागे पडली

एक वचन पाळले, ती जोडी नाही रडली

 

नवविवाहित दांपत्य, पण एकटे एकटे राहिले

चौदा वर्षे दोघांनी, दोघांना नाही पाहिले

 

सेवा करीत भावाची, रात्रंदिवस जागला

उर्मिलेने वनवास, महालात भोगला

 

 

@कवी रामदास आण्णा

प्रतिक्रिया व्यक्त करा