कट्टा :
जिल्ह्यातील परब मराठा समाज सिंधुदुर्ग यांच्यावतीने ६१ वा वर्धापन दिन सोहळा २२ डिसेंबर रोजी सकाळी ९ ते ३ या वेळेत नम्रता मंगल कार्यालय वराड कट्टा हडपीवाडी येथे साजरा करण्यात येणार आहे. सर्व परब ज्ञाती बांधवांनी या कार्यक्रमाला उपस्थित रहावे, आवाहन अध्यक्ष विनायक परब यांच्यावतीने करण्यात आले आहे.
यावेळी २०२४ रोजी झालेल्या १०. वी, १२ वीच्या शालांत परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा होणार आहे ज्या परब मराठा समाजाच्या मुलांना १० वीमध्ये ८० टक्के, १२ वीमध्ये ७५ टक्के व डिग्रीमध्ये ७५ टक्केप्रमाणे यश मिळाले आहे, अशा विद्यार्थ्यांना रोख स्वरुपात बक्षिसे देऊन गौरविण्यात येणार आहे. या विषयीची माहिती आपली झेरॉक्स प्रत संदीप (बबन) परब यांच्या व्हॉट्सॲप (नं. ९८३३८९५३०८) वर पाठवावीत. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील परब ज्ञाती रक्तदात्यांनी आत्तापर्यंत रक्तदान केले, त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. पुरस्कर्ते बापू परब यांच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला मराठा समाज ज्ञाती बांधवांनी उपस्थित राहवे, असे आवाहन जिल्हा अध्यक्ष विनायक परब यांच्यावतीने केले आहे.