You are currently viewing सिक्वेरा यांच्या परसबागेचे होत आहे पंचकृषित कौतुक.

सिक्वेरा यांच्या परसबागेचे होत आहे पंचकृषित कौतुक.

*सिक्वेरा यांच्या परसबागेचे होत आहे पंचकृषित कौतुक.*

माणगाव येथील अनिता बावतीस सिक्वेरा यांच्या परसबागेत चक्क गवार भाजीने 14 फुटाची उंची गाठली आहे.अजून सुद्धा उंची मध्ये वाढ होतच आहे,साधारणपणे गवार भाजी ची उंची ही 5 ते 6 फुट वाढते. परुंतु सिक्वेरा यांच्या अथक परिश्रम व नावीन्यपूर्ण कल्पनेमुळे त्यांच्या परसबागेत 14 फुटपर्यंत गवार भाजी ची उंची वाढली आहे. गावातील शेतकरी व नागरिक परसबागेचे कौतुक करत आहे, तसेच आजूबाजूच्या गावामध्ये सुद्धा कौतुक होत आहे. सिक्वेरा यांनी 26 जुन ला गवार भाजी आपल्या परसबागेत लावली होती. त्यांनी गवार भाजीला सुरवातीपासून बांबूचा आधार, शेणखत, व वेळेवर पाणी अशाप्रकारे योग्य ते नियोजन करून त्यांनी गवार भाजी परसबागेत वाढवली. यासोबतच त्या भेंडी,गवार,लाल भाजी,पालक,फरस बी,दोडकी, मूळा,वाली या सुद्धा भाजीपाला त्यांच्या परसबागेत आहेत. स्वतःच्या अथक परिश्रम, परसबागेविषयी असणारी आवड व कृषी विभागाच्या मार्गदर्शनामुळे त्या दरवर्षीचं परसबागेमध्ये विविध भाजीपाला घेत राहतात.परसबागेमध्ये भाजीपाला शेती करण्याचा छंद त्यांनी वर्षानुवर्षे जोपासला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा