सावंतवाडीतील मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल लवकर सुरू करा…
अन्यथा २६ जानेवारी रोजी जनआंदोलन छेडण्याचा इशारा
सावंतवाडी
मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे गाजर दाखवून लोकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याने व्हॉटस्अपच्या माध्यमातून तरुणांनी एकत्र येऊन सरकार, लोकप्रतिनिधी व प्रशासनावर दबाव गट निर्माण करण्याचा मळगाव भूतनाथ मंदिरमध्ये झालेल्या बैठकीत निर्णय घेतला. दरम्यान येत्या दि. २६ जानेवारी रोजी जनआंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेत डॉक्टरसह सुमारे ८०० कर्मचारी वर्ग कमी असल्याने जनता आरोग्यसेवेअभावी त्रस्त असल्याचे समोर आले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा रूग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक रुग्णालय मध्ये सुमारे ८०० पेक्षा जास्त कर्मचारी, डॉक्टरांची प्रतिक्षा आहे. मात्र ती भरून जनतेला सेवा दिली जात नाही म्हणून नाराजी व्यक्त करण्यात आली.
यावेळी झालेल्या चर्चेत ऍड संदीप निंबाळकर, अभिमन्यू लोंढे, काका सावंत, भूषण मांजरेकर, वासुदेव भोगले, सुधीर राऊळ, आनंद माळकर, संजय लाड यांच्यासहित उपस्थितांनी आरोग्य सेवा, वैद्यकीय साधने, डॉक्टर, कर्मचारी, शासकीय विमा योजना, रक्तदान, अपुरे कर्मचारी, ढिम्म प्रशासन आदी विषयांवर संताप व्यक्त करणारी चर्चा केली. उठसूठ बाबुंळी गोवा रूग्णालयात रूग्णांना रेफर करण्याचे प्रकार आणि अपघातातील रुग्णांना वेळेवर सेवा मिळत नसल्याने जीव गमावले जात आहेत त्यामुळे यापुढे सरकार आणि प्रशासनावर दबाव गट निर्माण करत आरोग्य सेवा, रक्तदान, आरोग्य शिबीर, रुग्णांच्या मदतीला धावून जाण्याची गरज आहे असे चर्चेत ठरले.
यावेळी संघटन करण्यासाठी भूषण मांजरेकर (रेडी), वासुदेव भोगले (बांदा), आनंद माळकर (तुळस), सुधीर राऊळ (मळगाव), अजित पोळजी ( तळवणे), अक्षय पार्सेकर ( न्हावेली), संजय लाड (माडखोल), निखिल पार्सेकर (आरोंदा), सुरज पालयेकर (दांडेली), अनिल जाधव (निगुडे), विनय गावडे (निरवडे), राकेश शेट्ये (पेंडुर), आनंद वरक (केसरी), परशुराम लांबर (केसरी), सिध्देश आजगावकर ( मळगाव), केतनकुमार गावडे ( पेंडुर), ओंकार परब आदींच्या उपस्थित आरोग्य सेवा संघटनेची स्थापना करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल लवकर सुरू व्हावे आणि अपुरे ८०० पेक्षा जास्त डॉक्टर व कर्मचारी भरती प्रक्रिया करण्यासाठी जनआंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी संदीप नेमळेकर, निखिल माळकर, सचिन पांगम, समीर पार्सेकर, गजानन सातार्डेकर, प्रसाद गावडे, ओंकार मोरजकर यांच्यासह असंख्य तरुणांनी बैठकीत सहभाग दर्शवला होता.
महाराष्ट्रात डॉक्टर पगार दरमहा 80 हजार रुपये बोंडेड एक वर्षासाठी जिल्हाधिकारी सिव्हिल सर्जन यांना अधिकार दिलेला आहे. नेमणूक करण्यासाठी हा काँग्रेस पक्षाच्या काळापासून पगार चालू आहे गेले 25 वर्षे शासनाचे पर्मनंट भरती एक लाख वीस हजार 40 हजार रुपये अ लॉन्स एकूण एक लाख 60 हजार रुपये यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये डॉक्टर रुग्णालयात यायला इच्छुक नसतात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कॉलेजमध्ये परमनंट प्रोफेसरांना दोन लाख 50 हजार रुपये पगार चालू आहे. याचा विचार करा फक्त शासनाच्या रुग्णालयामध्ये अपेन्डिस हर्निया गर्भपिशवी काढणे गरोदर स्त्रियांची प्रसूती हृदयविकाराचा झटका पॅलेसिस ताप सर्दी, खोकला दमा एवढेच आजार महाराष्ट्रातील शासकीय रुग्णालयांमध्ये करायचा नियम आहे बाकी सर्व आजार महाराष्ट्रातील 2000 खाजगी रुग्णालय विविध जिल्ह्यांमध्ये महात्मा फुले जीवनदायी जन आरोग्य योजना या खाली येतात तेराशे छप्पन प्रकारचे शस्त्रक्रिया या योजनेअंतर्गत होतात याचं भाग्य तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना जातं. त्यावेळी आठ जिल्ह्यांना ही योजना चालू होती त्या काळामध्ये 2013 नोव्हेंबर यापूर्वी एक महिना आधी मुख्यमंत्री तत्कालीन पृथ्वीराज चव्हाण तत्कालीन मुख्यमंत्री सावंतवाडी राजवाडा मध्ये आले होते त्यावेळी मी स्वतः राजेंद्र मसुरकर जीवनरक्षा प्रतिष्ठानचे अध्यक्ष ही योजना महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्ह्यांना म्हणजेच महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांना सुरू व्हावी यासाठी निवेदन दिले होते माझा सोन्या-चांदीचा व्यापार असून माझ्याजवळ अनेक गोरगरीब आपले मूल्यवान दागिने मंगळसूत्र गळ्यातील विकतात आपल्या आजारपणात हे मी स्वतः तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण चव्हाण यांना सांगितले होते राजवाड्यामध्ये राजमातांच्या समोर त्या का 2013 पूर्वी आमच्या सिंधुदुर्ग जिल्हा रत्नागिरी कोल्हापूर सातारा सांगली पुणे असे विविध 28 जिल्हे 2013 पूर्वी योजनेमध्ये नव्हते फक्त आठ. महाराष्ट्रातील जिल्ह्याला योजना चालू होती महाराष्ट्रातील 28 जिल्ह्यांना ही योजना चालू होती त्या काळात मी सांगितलं आपण मुख्यमंत्री झालात ज्या जिल्ह्याने आपल्याला मुख्यमंत्री केलं आहे आहे त्या जिल्ह्याला सुद्धा आपण ही योजना दिलेली नाही आहे व ती राजीव गांधी जीवनदायी जन आरोग्य योजना संपूर्ण महाराष्ट्राला चालू व्हावी त्यामुळे मुख्यमंत्री आपल्याला गोरगरीब रुग्णांचा आशीर्वाद घ्या आणि संपूर्ण महाराष्ट्राला ही योजना चालू करा असे ती त्यांना मी 2013 नोव्हेंबर पूर्वी बोललो होतो एक महिन्यामध्ये ही योजना चालू करा असे दीपक भाई मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्ह्यांना चालू केली फक्त माझ्या निवेदनानुसार एवढे भाग्य तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना जाते आणि मला हे मानसिक समाधान आहे हे पुण्य माझ्या पदरी जमा झालेले आहे त्यावेळी दीपक भाई असे काम करा की आपल्याला परमेश्वर सत्कार्य काम केल्यानंतर आरोग्य आयुष्य देईल तुम्हाला लाभेल तर ऐश्वर्य आहे हे ईश्वर आपण सत्तेत आल्यानंतर आपले कार्य मोजमाप करत असतो जेवढे पुण्य काम कराल एवढे पुढील जन्मी आपल्याला आरोग्य आयुष्य ऐश्वर्या धनसंपत्ती लाभेल पुढील सुद्धा जन्मी शिक्षण मंत्री दीपक भाई केसरकर यांना मी मेसेज पाठवलेला आहे हा मेसेज पाठवला तो जशाच्या तशा आहे तो आपल्याला फॉरवर्ड करत आहोत.
जिल्हा सिंधुदुर्ग त्याचप्रमाणे आपण दीपक भाई डॉक्टरांना पगार चांगला दिला तर सबंध महाराष्ट्र मध्ये शासकीय रुग्णालयामध्ये डॉक्टर काम करायची मानसिकता होऊ शकते एवढ्या कमी पगारांमध्ये डॉक्टर काम करतात रात्री बे रात्री सुद्धा डॉक्टर गरोदरपणामध्ये प्रसूती करतात महिलांची पुनर्जन्म सुद्धा देतात एवढं चांगलं काम डॉक्टरांकडून होत असतं पण आपल्याकडून त्यांची साधी विचार चौकशी सुद्धा होत नाही त्यांचे अडचणी जाणून घेत नाही हे मला वाईट वाटते ते मी तुम्हाला सांगत आहे तुम्ही आणि मी एकत्र काम केले होते तुम्ही नगराध्यक्ष होतात मी नगरसेवक होतो रोज माझ्या आणि तुमचे वैचारिक मतभेद होते ते आता बाजूला सोडून आपण गोरगरीब रुग्णांसाठी काहीतरी करूया जेणेकरून पक्षात आपल्या खूप छान अनेक वर्षे सुद्धा जनता आपली मनामध्ये आशीर्वाद देईल आपला विश्वासू जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र मसुरकर सावंतवाडी उभा बाजार सिंधुदुर्ग यांनी विश्वास व्यक्त केला.
बघा महाराष्ट्रातील गेल्या आठ वर्षांपूर्वी आलेली सकाळ मधली बातमी पहा महाराष्ट्रातील बारा कोटी जनतेपैकी 97 लाख 29 हजार रुग्णांनी शस्त्रक्रिया मोफत करून घेतली आहे याची भाग्य श्री तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना जाते त्याने हे पुण्य काम केलं आहे खाजगी रुग्णालयात योजना सुरू झाल्यामुळे शस्त्रक्रिया औषधे जेवण व प्रवास खर्च दरवर्षी दीड लाख रुपये या योजनेअंतर्गत मिळतात आपल्या सरकारने आता 2024 जुलैपासून पाच लाख रुपयाची योजना सुरू केली आहे 2013 नोव्हेंबर पासून ही दीड लाख रुपये योजना चालू होती प्रति कुटुंबाला शिक्षण मंत्री दीपक भाई केसरकर यांना फोटो सुद्धा टाकलेले आहेत मी आपला विश्वासू राजेंद्र मसूरकर