देवगड –
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निसर्गरम्य परिसरात परिचित असलेल्या श्री क्षेत्र गणेश मंदिर ट्रस्ट बांदेगाव येथे श्री गणेश मंदिराचा ४६ वा वर्धापन दिन सोहळा दि. १७ मंगळवार व दि. १८ बुधवार रोजी साजरा करण्यात येणार आहे. मंगळवार दि. १७ रोजी महाप्रसादाचे आयोजन केले असून दि. १८ बुधवार या दिवशी सकाळी ७ वा. पासून श्री गणेश व इतर देवदेवतांची पूजाअर्चा ८ वाजता सामुदायिक श्रींचा अभिषेक दुपारी दोन वाजता श्री सत्यनारायण महापूजा व तीर्थप्रसाद ४ वाजता महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ आदी भरगच्च कार्यक्रमासोबत पंचक्रोशीतील नामवंत भजनी मंडळे यांची भजन रात्री ९ वाजल्यापासून सुरू करण्यात येतील असे ट्रस्ट तर्फे सूचित केले आहे. यात चौडेश्वरी प्रासादिक भजन मंडळ, गिर्ये बुवा प्रल्हाद घाडी, श्री रवळनाथ प्रासादिक भजन मंडळ, तिर्लेट मोवळूवाडी बुवा प्रभाकर बाईत, श्री गजानन प्रासादिक भजन मंडळ,पुरळ गडदेवाडी बुवा अजित मुळम सुस्वर भजने सादर करणार आहेत. यानिमित्ताने गणेश भक्तांनी श्री दर्शनाचा व तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री क्षेत्र गणेश मंदिर ट्रस्ट बांदेगाव यांच्यावतीने करण्यात आले आहे.