You are currently viewing काय सांगू ?

काय सांगू ?

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*🪷🪷काय सांगू ?🪷🪷*

 

तू झालीस माझी जेंव्हा मौनात बोलली होती

नजरेची माझ्या पुष्पे वेणीत माळली होती ।।

 

होता अबोल वारा अन् तृप्ताक्ष ते कवडसे

माझीच झोपडी साधी नूतनता ल्याली होती ।।

 

ओठांचे भाव हवेसे अन् बाहू आसुसलेले

हृदयात भावनांना जागाच मोकळी होती ।।

 

वक्षावर विश्वासाने टेकविला माथा जेंव्हा

अन् मिटले डोळे तेंव्हा नजरेत झळाळी होती ।।

 

तू दिधले सर्वार्थाने निःशंक होऊनी सारे

त्या तुझिया अंगांगाला रेशीम सळाळी होती ।।

 

*©सर्वस्पर्शी*

©कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख

९८२३२१९५५०

प्रतिक्रिया व्यक्त करा