*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ कवयित्री शीला पाटील लिखित अप्रतिम काव्यरचना*
*आई*
शब्द पडतील फिके
गातां थोरवी तुझी आई
संस्कारात तुझ्या वाढलो
झोळीत ऐकली अंगाई
गुण लिहिता लिहिता
कागद पुरणार नाही
किती गाऊ तुझी माया
*सा रे ग म लाजतील* बाई
कुठे शोधु अशी लेखणी
पुरेल का गं दऊत शाई
साहित्यातील शब्दशब्द
करतील बोलण्याची घाई
हृदय मंदीरात माझ्या
वसते तुझेचं सुंदर रूप
तुझ्याचं संस्कारात गं
जगण्याची स्फुर्ती खुप
तुझ्या वात्सल्य पंखात गं
स्वर्ग मजला दिसतो
तुझ्या प्रेमळ डोळ्यात गं
उज्वल भविष्य भासतो
कष्ट केले आम्हासाठी
देह झिजवलास गं
जन्मोजन्मी तुझ्याचं कुशी
घेवु दे मज जन्म गं
*शीला पाटील. चांदवड.*