You are currently viewing कै. श्रीमती शुभदा श्याम हळदणकर ,उभा बाजार सावंतवाडी स्मरणार्थ उपजिल्हा रुग्णालयाला इलेक्ट्रिक जग( किटली) भेट

कै. श्रीमती शुभदा श्याम हळदणकर ,उभा बाजार सावंतवाडी स्मरणार्थ उपजिल्हा रुग्णालयाला इलेक्ट्रिक जग( किटली) भेट

कै. श्रीमती शुभदा श्याम हळदणकर ,उभा बाजार सावंतवाडी स्मरणार्थ उपजिल्हा रुग्णालयाला इलेक्ट्रिक जग( किटली) भेट

सावंतवाडी

*कै. श्रीमती शुभदा श्याम हळदणकर ,उभा बाजार सावंतवाडी यांचे निधन होऊन त्यांच्या बाराव्या दिवशी त्यांच्या स्मरणार्थ त्यांचे पुतणे श्री कांचन हळदणकर यांनी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला इलेक्ट्रिक गरम पाणी करायचे जग( किटली) रुग्णालयातील पाच विभागांना पाच नग भेट म्हणून जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांच्यामार्फत देण्यात आली.*

*कै. श्रीमती शुभदा श्याम हळदणकर राहणार उभा बाजार सावंतवाडी यांचे निधन झाल्याने बाराव्या दिवशी त्यांच्या स्मरणार्थ त्यांचे पुतणे श्री.कांचन हळदणकर यांनी सिंधुदुर्ग जिल्हा सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला इलेक्ट्रिक गरम पाणी करायचे ( जग) किटली नग पाच भेट म्हणून जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री राजू मसुरकर यांच्यामार्फत भेट देण्यात आली‌‌*.

*दोन महिन्यापूर्वी श्रीमती शुभदा श्याम हळदणकर ही आजारी असल्याने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आली होती. तिच्यावर चांगले योग्य ते उपचार झाल्यानंतर त्या घरी परतल्यानंतर काही दिवसांपूर्वी त्यांचे अल्पशा आजाराने स्वतःच्या घरी निधन झाले होते*.

*त्यांचे पुतणे श्री कांचन हळदणकर हे सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात आपली काकी श्रीमती शुभदा श्याम हळदणकर उपचार करण्यासाठी रुग्णालयात ऍडमिट असल्याने रुग्णालयात येत होते*.

*त्यावेळी जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसूरकर हे सर्वसामान्य गोरगरीब रुग्णांना चांगली सेवा मिळावी याची दक्षता घेत असतात हे वृत्तपत्रात कांचन हळदणकर नेहमी वाचत होते*.

*प्रत्यक्षात आज राजू मसूरकर यांची सर्वसामान्यांसाठी अस्मरणीय रुग्णसेवा पाहून श्री.कांचन हळदणकर यांनी आपल्या काकीच्या निधन झालेल्या बाराव्या दिवशी राजू मसुरकर यांच्या गोल्ड (सोने चांदी दागिन्यांचे) शोरूम मध्ये येऊन काही रक्कम राजू मसुरकर यांच्या कडे देण्यात आली. आणि राजू मसुरकर यांची अस्मरणीय त्यांची रुग्ण सेवा व रुग्णांसाठी दक्षता घेण्याचे कार्य पाहून भारावून त्यांनी स्वतःहून असे उद्गार काढले होते आणि ती रक्कम उपजिल्हा रुग्णालयाला आवश्यक असलेल्या वस्तू स्वरूपात त्याचा उपयोग व्हावा यासाठी मसूरकर यांच्याकडे ती रक्कम सुपूर्त करण्यात आली*.

*यानंतर मसुरकर यांनी ग्रामीण भागातून गोरगरीब रुग्ण येत असतात. त्या रुग्णांना गरम पिण्याच्या पाण्याची आवश्यकता असते. रुग्णांचे नातेवाईक गरम पिण्याचे पाणी रुग्णालयाच्या शेजारी असलेल्या आरेकर हॉटेलमध्ये जाऊन गरम पिण्याचे पाणी आणत असतात*.

*याचे बारकाईने निरीक्षण राजू मसूरकर यांनी करून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाच्या पाचही रुग्णविभागाच्या विभागांना गरम पाणी सर्वसामान्य रुग्णांना मिळावे यासाठी इलेक्ट्रिक गरम पाण्याचे किटली (जग) भेट म्हणून देण्यात आले*.

*त्यामुळे रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर गिरीश चौगुले तसेच जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी श्री कांचन चंद्रकांत हळदणकर व हळदणकर कुटुंबीयांचे सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातर्फे आभार मानले आहेत*.

*आपला विश्वासू*
*राजेंद्र प्रभाकर मसुरकर*
*जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा सोने-चांदी दागिन्यांचे व्यापारी*
*उभा बाजार, सावंतवाडी*
*मो. ९४२२४३५७६०*

प्रतिक्रिया व्यक्त करा