मुंबई – दरवर्षी प्रमाणे श्री समर्थ सद्गुरु राऊळ महाराजांच्या मुलुंड (पूर्व) येथील गुरूस्थानी श्री दत्तजयंती उत्सव आणि श्री सत्यनारायण महापूजा सोहळा मार्गशीर्ष शुद्ध १४ शके १९४६ शनिवार दिनांक १४ डिसेंबर २०२४ रोजी डी / ५ औदुंबर सोसायटी, म्हाडा कॉलनी, राऊळ महाराज मार्ग मुलुंड (पूर्व) येथे आयोजन करण्यात आले आहे. दत्तप्रसाद मंडळाचे हे एकेचाळीसावे वर्षं आहे. सकाळी ८.३० ला नित्य नैमित्तिक पूजेने सोहळ्याला प्रारंभ करून श्री सत्यनारायण पूजेची सुरूवात करण्यात येईल. यावेळी सद्गुरू गुरूदास माऊली गुरूचरित्र, दासबोध अध्याय यावर प्रबोधनात्मक मार्गदर्शन केल्यानंतर महाआरती, महाप्रसाद तसेच दुसऱ्या स्तरात नामस्मरण, गुरू मंत्राचे स्मरण, सुस्वर भजन असे धार्मिक विविध कार्यक्रम संपन्न होणार आहेत. समस्त भाविक भक्तांनी मोठया संख्येने उत्सवात सहभागी होऊन आनंदाची लुटी करावी असे आवाहन श्री समर्थ सद्गुरु राऊळ दत्तप्रसाद भक्त मंडळ व कार्यकारी मंडळाच्या वतीने करण्यात आले.

मुलुंड (पूर्व) राऊळ महाराज गुरुस्थानी दत्तजयंती सोहळ्याचे आयोजन
- Post published:डिसेंबर 9, 2024
- Post category:धार्मिक / बातम्या / मुंबई / विशेष / सिंधुदुर्ग
- Post comments:0 Comments