You are currently viewing श्री गजानन विजय काव्यांजली काव्यपुष्प – ७५ वे 

श्री गजानन विजय काव्यांजली काव्यपुष्प – ७५ वे 

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी अरुण वी. देशपांडे लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

।। गण गण गणात बोते ।। जय गजानन ।।

___________________________

श्री गजानन विजय काव्यांजली काव्यपुष्प – ७५ वे 

अध्याय – १३ वा , कविता – ३ री

___________________________

सवदड गावाच्या गंगाभारती गोसाव्याला । महारोग झाला।

अतित्रास होऊ लागला । त्याने विचार केला ।।१।।

 

जाऊ शेगावाला । श्री गजानन दर्शनाला । बरे वाटेल मला।

स्वामी दर्शनाने ।। २ ।।

 

येता हा शेगावला । पाहून लोक अडविती त्याला । जाऊ न देती दर्शनाला । श्री गजानन स्वामींच्या ।। ३ ।।

 

एक दिनी भलतेच झाले । गोसाव्याने लोकांना चुकविले ।

अन पायी डोके टेकविले । समर्थांच्या ।। ४ ।।

 

स्वामींनी त्याजकडे पाहिले । अन दोन्ही हातानी तोंडावर मारिलें। अंगावरी खाकरले । गंगाभारतीच्या ।। ५।।

 

गोसाव्याने हाच प्रसाद समजला । तो अंगावर लावला ।

औषधा सारखाच मानला । त्याने ।। ६ ।।

 

एका कुटाळाने शंका काढिली । गोसाव्याने ती दूर केली ।

कुत्सित कल्पना निवारिली । त्या कुटाळ इसमाची ।। ७ ।।

 

स्वामींच्या समोर गोसावी बसला ।नित्य भजन करू लागला। या सेवेचा प्रभाव दिसला । महारोग त्याचा निमाला ।।८ ।

************

करी क्रमशः हे लेखन कवी अरुणदास

__________________________

_कवी अरुणदास – अरुण वि.देशपांडे- पुणे.

____________________________

प्रतिक्रिया व्यक्त करा