You are currently viewing बांगलादेशामधील हिंदूंवरील अत्याचार प्रकरणी हिंदूंचा ” मूक मोर्चा ” जिल्हाधिकारी भावनांवर धडकणार !

बांगलादेशामधील हिंदूंवरील अत्याचार प्रकरणी हिंदूंचा ” मूक मोर्चा ” जिल्हाधिकारी भावनांवर धडकणार !

बांगलादेशामधील हिंदूंवरील अत्याचार प्रकरणी हिंदूंचा ” मूक मोर्चा ” जिल्हाधिकारी भावनांवर धडकणार !

जिल्ह्यातील हिंदूंनी दि. १० रोजी मुक आंदोलनात सामील व्हावे

विश्वहिंदू परिषदेचे जिल्हा मंत्री संतोष प्रभू

सिंधुनगरी प्रतिनिधी

बांगलादेशा मधील अल्पसंख्यांक असलेल्या हिंदू कुटुंबे, हिंदू महिला यांच्यावर इस्लामिक कट्टरवाद्यानी अत्याचार सुरू केले आहेत. हिंदू साधू व हिंदूंवरील अमानवी अत्याचार ही अत्यंत चिंतेची बाब आहे. म्हणूनच संपूर्ण देशभर याचे पडसाद उमटले आहेत. बांगलादेश सरकार या अत्याचारास मूकसंमती देत असून त्या विरोधात देशभरातील हिंदूनी संघटित होण्याची गरज आहे. याच पार्श्वभूमीवर प्रत्येक जिल्ह्यात मंगळवार दि. १० डिसेंबर रोजी हिंदूंचा मूक मोर्चा जिल्हाधिकारी भावनावर धडकणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही हिंदूंचा विराट मोर्चा होईल व या मोर्चात सर्व हिंदूंनी सामील व्हावे असे आवाहन या मुक आंदोलनाचे निमंत्रक विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा मंत्री संतोष प्रभू यांनी केले आहे.
बांगलादेशातील हिंदू समाजावर होत असलेला अत्याचार कायमस्वरूपी बंद व्हावा आणि इस्कॉनच्या साधूंची तात्काळ मुक्तता व्हावी याकडे लक्ष वेधण्यासाठी देशभर मुक आंदोलन होत आहे. यानिमित्ताने जिल्हाधिकारी भवनावर हिंदू बांधवांचा मूक मोर्चा होत आहे.

बांगलादेशामध्ये हिंदू समाजावर आणि अल्पसंख्यांक समाजावर कट्टरपंथीयांद्वारे अत्याचार होत आहेत. त्यांची मंदिरे, घरे, दुकाने जाळली जात आहेत. तेथील हिंदू महिलांवर देखील अमानवीय पद्धतीने अत्याचार होत आहेत.आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने याची दखल घ्यावी व तेथील मुंडा, चकमा, कुकी,बौद्ध इत्यादी आदिवासी व दलित हिंदू बांधवांना ईस्लामी कट्टरतावाद्यांनी अवैध मार्गाने जीवन जगणे अत्यंत कष्टप्रद करून टाकले आहे.
बांगलादेशचे सरकार देखील हिंदूंसोबतच अन्य अल्पसंख्याकांवरील अत्याचाराचास मूकसंमतीच देताना दिसून येत आहे.
या सर्व अत्याचाराची भारतातील हिंदू समाजास चिंता वाटत आहे. आम्ही अत्यंत कठोर शब्दात याचा निषेध व्यक्त झाला आहे. या सर्व अत्याचाराचा निषेध शांततेने आणि लोकशाही मार्गाने व्यक्त करणाऱ्या इस्कॉनच्या साधूंना देखील बांगलादेशच्या सरकारने देशद्रोह्याची कठीण कलमे लावून तुरुंगात डांबले आहे. स्वातंत्र्याच्या वेळी बांगलादेश मधील हिंदूंची संख्या 38 टक्के होती ती घटना आज केवळ आठ टक्केच राहिली आहे. आपल्या सरकारने जर वेळीच पावले उचलली नाही तर बांगलादेशातील 8% हिंदू व अन्य अल्पसंख्यांक समाज जिहादी इस्लामी कट्टरता वादाला बळी पडून संपूर्णपणे नामशेष होईल, असे भविष्य स्पष्टपणे दिसून येत आहे.
त्यामुळे आम्ही सकल हिंदू समाज भारत सरकारला आवाहन करतो की, बांगलादेशातील हिंदूंच्या संरक्षणासाठी आवश्यक ते सर्व उपाय तात्काळ अमलात आणावेत आणि अटकेत असलेल्या बांग्लादेशातील साधूंची त्वरित मुक्तता व्हावी यासाठी बांगलादेशी सरकारला निर्देश द्यावे.
सर्व हिंदूंना आवाहन करण्यात येते की हिंदू समाजाच्या वेदना व्यक्त करण्यासाठी व त्याबाबत सरकारला निवेदन देण्यासाठी मंगळवार दिनांक 10 डिसेंबर 2024 या दिवशी सकाळी 10 वाजता छत्रपती शिवाजीमहाराज पुतळा, ओरोस येथे मोठ्या संख्येत एकत्र जमावे.
तसेच सर्व प्रसारमाध्यमांना विनंती आहे की त्यांनी बांगलादेशमधील हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारांविरुद्ध भूमिका घ्यावी. असे झाले तरच आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमे, आंतरराष्ट्रीय समुदाय व मानवाधिकार आयोगाचे लक्ष वेधले जाईल व हिंदू समाजावरील अत्याचारांविरुद्ध ते भूमिका घेतील.
सकल हिंदू समाज च्या वतीने विश्व हिंदू परिषदेने हे आवाहन केले आहे.

शिवछत्रपतींच्या पुतळ्याकडून मोर्चा निघणार
सिंधुदुर्गातील सर्व तालुक्यांमधून हिंदू नागरिक या मूक मोर्चा सहभागी होणार आहेत. दिनांक १० डिसेंबर रोजी सकाळी १०. वा. सिंधु दुर्ग नगरी येथील शिवछत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्यापासून हा मुक मोर्चा थेट जिल्हाधिकारी भावनाकडे निघेल. कोणतीही घोषणाबाजी न करता शांतपणे हा मोर्चा जिल्हाधिकारी भावनावर धडकताच तेथे त्याचे विराट सभेत रुपांतर होईल. मोठ्या संख्येने हिंदू बांधव या मुका आंदोलनात सामील होणार असल्याने कुडाळ वेंगुर्ला सावंतवाडी दोडामार्ग या मार्गाने येणाऱ्या वाहनांसाठी आरटीओ ऑफिस शेजारील गोविंद मार्केट ठिकाणी वाहन पार्किंग व्यवस्था तर कणकवली देवगड वैभववाडी व मालवण कडून येणाऱ्या वाहनांसाठी डॉन बॉस्को समोरील मैदान पार्किंग व्यवस्थेसाठी तयार करण्यात आले आहे. या मोर्चात सर्व हिंदू बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा